The Kerala Story Controversy: 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाच्या रिलिजनंतर अनेक वाद निर्माण होत आहे. हा चित्रपट मनोरंजन विश्वातच नाही तर राजकारणात देखील वादाचा मुद्या ठरला आहे.
अनेक राजकिय नेत्यांनी या चित्रपटाला पाठिंबा देत चित्रपट पाहण्याचे आवाहन केले तर अनेक राजकिय नेत्यांनी चित्रपटांला प्रोपगंडा ठरवत चित्रपटावर बंदीची मागणी केली.
इतकचं नाही तर तमिळनाडूनंतर पश्चिम बंगाल सरकारनेही या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे.
पश्चिम बंगालच्या चित्रपटगृहात हा चित्रपट दाखवला जात नाही आहे. त्यामुळे चित्रपट निर्माते विपुल शाह हे संतापले होते. आता 'द केरळ स्टोरी'वरील बंदीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे.
विपुल शहा यांचे वकील अमित नाईक लवकरच याप्रकरणात तक्रार दाखल करणार आहेत. या प्रकरणात, ते आरक्षणाच्या निर्णयाचा संदर्भ देणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश जारी केला होता, ज्यामध्ये म्हटले होते की CBFC ने मंजूर केलेल्या कोणत्याही चित्रपटावर कोणतेही राज्य बंदी घालू शकत नाही.
त्याच झालं असं की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी कोणत्याही प्रकारच्या द्वेष आणि हिंसाचाराने भरलेल्या घटना किंवा त्याचा निषेध टाळण्यासाठी राज्यात 'द केरळ स्टोरी'च्या रिलीजवर बंदी घालण्याचे आदेश दिले.
विपुल शाह यांनी ममता बॅनर्जींच्या या आदेशावर कायदेशीर कारवाई करणार असल्याच बोललं जात आहे.
विपुल शाह तामिळनाडूतही गुन्हा दाखल करणार आहेत कारण तिथेही चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे.
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये द केरळ स्टोरीवर बंदी घालण्यात आली आहे, तर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे.
'द केरळ स्टोरी' याचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले असून विपुल अमृतलाल शाह यांनी निर्मिती केली आहे. तर कलाकारांबद्दल सांगायचं झाल तर अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी मुख्य भूमिकेत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.