The Kerala Story: भारतात बंदीची मागणी होत असतानाच 'द केरळ स्टोरी' 37 देशांमध्ये प्रदर्शनासाठी सज्ज

The Kerala Story Controversy
The Kerala Story ControversyEsakal
Updated on

सुदीप्तो सेन दिग्दर्शित द केरळ स्टोरी सध्या थिएटरमध्ये आहे. हा रिलिजआधीच वादात सापडलेला असतांना हा वाद चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही अधिक वाढलेला दिसत आहे. अनेक नेत्यानी या चित्रपटाला समर्थन दिले आहे तर अनेकांनी या चित्रपटाला प्रोपगंडा म्हणत त्याच्यावर टिका केली आहे.

मात्र वाद सुरु असला तरी चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन पाच दिवस झाले आहेत. दरम्यान पाच दिवसातच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 50 कोटींचा टप्पा पार केला आहे.

दरम्यान आता चित्रपटाची मुख्य अभिनेत्री अदा शर्मा हिने चित्रपटाशी संबंधित आणखी एक माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

The Kerala Story Controversy
The Kerala Story: टिमला खास निमंत्रण! योगी कॅबिनेटसोबत केरळ स्टोरी पाहणार...

एकीकडे भारतात अनेक राज्यात चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी होत असतांनाच दुसरीकडे निर्मात्यांनी द केरळ स्टोरी या चित्रपटाला इतर देशांमध्येही प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा चित्रपट आणखी 37 देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अदा शर्मानं स्वत: ही माहिती पोस्ट शेअर करत दिली आहे.

The Kerala Story Controversy
The Kerala Story Controversy: ममता बॅनर्जींना चॅलेंज! द केरळ स्टोरीच्या बंदी विरोधात निर्मात्यांची सुप्रीम कोर्टात धाव..

अदा शर्माने इंस्टाग्रामवर चित्रपटाशी संबंधित काही फोटो शेअर केली आहेत. या पोस्टमध्ये तिने चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल लोकांचे आभार मानले आहेत.

तिने लिहिले की, जे लोक तिचा चित्रपट पाहणार आणि पाहत आहेत त्यांचे आभार. हा ट्रेंड बनवल्याबद्दल धन्यवाद. पुढे, तिने त्या लोकांचे आभार मानले ज्यांना त्यांची कामगिरी आवडते.

अदा शर्माने पुढे सांगितले की, तिचा  द केरळ स्टोरी हा चित्रपट या वीकेंडला १२ मे रोजी आणखी 37राज्यामध्ये रिलिजसाठी सज्ज आहे.

The Kerala Story Controversy
Nawazuddin Siddiqui: सेटलमेंट झाली वाटतं? बायकोनंतर नवाजचेही बदलले सुर.. म्हणतोय, 'तिच्या बद्दल काहीच तक्रार..'

 'द केरळ स्टोरी' ने आतापर्यंत एकूण 57.62 कोटींची कमाई केली आहे. द केरळ स्टोरी लवकरच बॉक्स ऑफिसवर शतक पुर्ण करेल अशा अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 'द केरळ स्टोरी' याचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले असून विपुल अमृतलाल शाह यांनी निर्मिती केली आहे. तर कलाकारांबद्दल सांगायचं झाल तर अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी मुख्य भूमिकेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()