The Kerala Story विरोधात पुण्याच्या FTII मध्ये विदयार्थी आक्रमक.. स्पेशल स्क्रिनिंग बंद पाडण्याचा प्रयत्न

पोलिसांच्या कडक बंदोबस्तात 'द केरळ स्टोरी' सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग पुण्याच्या FTII मध्ये सुरु ठेवण्यात आलं.
Protest Against  The Kerala Story at Pune FTII
Protest Against The Kerala Story at Pune FTIIEsakal
Updated on

The Kerala Story: 'द केरळ स्टोरी' सिनेमावरनं सुरु असलेला वाद काही थांबायचं नाव घेईना. असं असलं तरी सिनेमा मात्र बॉक्सऑफिसवर तुफान कमाई करत आहे. यादरम्यान पुण्यातील FTII मध्ये 'द केरळ स्टोरी' सिनेमाचं स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं. पण यासाठी विदयार्थ्यांच्या एका गटाचा सिनेमाला कडाडून विरोध होता.

स्क्रिनिंगआधी त्या गटानं एफटीआयच्या परिसरात मोठं आंदोलनही पुकारलं. पण या विदयार्थ्यांच्या विरोधाला न जुमानता 'द केरळ स्टोरी' सिनेमाचं स्क्रीनिंग सुरु ठेवण्यात आलं. या स्क्रिंनिग वेळेस 'द केरळ स्टोरी' सिनेमाची स्टाकास्टही उपस्थित राहणार असल्यानं पोलिस मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले होते.(Protest Against The Kerala Story at Pune FTII)

Protest Against  The Kerala Story at Pune FTII
The Kerala Story Box office Collection: बाबो..समोर येईल त्या सिनेमाला आपटतोय द केरळ स्टोरी..कमाईचा तांडव सुरुच
Protest Against  The Kerala Story at Pune FTII
Protest Against The Kerala Story at Pune FTIIGoogle

भारतीय चित्रपट आणि दूरचित्राणी संस्थेत (एफटीआयआय) शनिवारी सकाळी 'द केरला स्टोरी'चे स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होती. यावेळी संस्थेतील विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी संघटनेने विरोध दर्शवत सिनेमाला विरोध केला. सकाळी ९ वाजता सिनेमा सुरू होताना दोन्ही गटांकडून घोषणाबाजी करण्यात आली.

मागील काही दिवसांपासून एफटीआयआयमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कारणास्तव आंदोलन चालू होते. शनिवारी सकाळीच केरला स्टोरी मुळे आंदोलनाची दिशा बदलली. एफटीआयआयमधील २०२० च्या तुकडीतील पाच विद्यार्थ्यांना प्रशासनाने शैक्षणिक वर्षातील अनुपस्थिती आणि अपेक्षित गुणांकन नसणे या कारणास्तव काढून टाकले होते. या विरोधात एफटीआयआय स्टुडंट्स असोसिएशनने गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे.

उपोषणाचा पाचवा आणि आंदोलनाचा चाळीसावा दिवस चालू होता. केरला स्टोरीच्या स्क्रीनिंगलाही संघटनांनी विरोध केला असून पोलीस बंदोबस्तात स्क्रीनिंग पार पडले. शहरातील चित्रपट, नाट्य आणि अभिनय क्षेत्रातील अनेकांनी सिनेमाला उपस्थिती दर्शवली होती.

'द केरळ स्टोरी' सिनेमा रिलीज होण्याआधीपासूनच वादात होता. या सिनेमावरनं राजकीय पक्षही मैदानात उतरलेले आपण पाहिले. पण सिनेमानं रिलीजपासून १५ दिवसांत जवळपास १५० करोडचा टप्पा पार केला आहे.

या वीकेन्डलाही सिनेमानं जोर धरला तर लवकरच २०० करोडच्या क्लबमध्ये सिनेमा जाईल असं म्हटलं जात आहे. बॉक्सऑफिसवर सिनेमानं बड्या बड्या ६ सिनेमांना मागे टाकलं आहे. यात सलमान,रणबीरपासून सगळ्यांचेच सिनेमे गारद पडले आहेत.

Protest Against  The Kerala Story at Pune FTII
Mira Rajput: 'मला घरी जाऊ द्या..', पापाराझींना विनवणी करत भर कार्यक्रमातनं मीरानं घेतली घराकडे धाव..असं काय घडलं?
Protest Against  The Kerala Story at Pune FTII
Satish Kaushik यांची हत्या झाली म्हणणारी महिला अडचणीत.. कोर्टानं तिचाच डाव तिच्यावरच उलटवला.. 15 जूनला होणार निर्णय

द केरळ स्टोरी सिनेमाचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन रिअल लाइफमधील पीडित धर्मांतर झालेल्या महिलांना कॅमेऱ्यासमोर आणत खळबळ उडवून दिली होती.

या सिनेमातील कथेवर अनेकांनी आक्षेप घेतला होता ते केरळमधून ३२ हजार महिलांचे धर्मांतर करुन त्यांना दहशतवादी संघटनेत दाखल केल्याचे दाखवल्यामुळे.

पण या पत्रकार परिषदेत ही कथा कशी सत्य आहे त्याचा दाखला दिग्दर्शकानं दिल्यानं आता सिनेमाला अधिक प्रतिसाद मिळू लागला आहे. पण असं असलं तरी सिनेमाविरोधात रोज एक नवा वाद समोर येत आहे.

पुण्यातील FTII मध्ये या सिनेमाच्या स्क्रिनिंगवरच घाला घालण्याचा प्रयत्न केला गेला पण कडक पोलिस बंदोबस्तात त्याला चोख प्रतिउत्तर दिले गेले. यावेळी काही अभिनेत्यांच्या प्रतिक्रिया देखील समोर आल्या आहेत.

जसा मला चित्रपट पाहण्याचा अधिकार आहे. तसाच विद्यार्थ्यांनाही द केरला स्टोरी चा विरोध करण्याचा अधिकार आहे. त्यांनी चित्रपट पाहावा मग बोलावे.

- योगेश सोमण, अभिनेते

आज-काल विरोधाची ही परंपरा निर्माण झाली आहे.विद्यार्थ्यांनी चित्रपट पाहिल्यानंतरच विरोध करायला हवा.

- राहुल सोलापूरकर, अभिनेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.