The Kerala Story: केरळ स्टोरी रिलीजआधीपासूनच वादात आहे. आणि अजूनही वाद या सिनेमाला चिटकूनच आहे. या सिनेमावर राज्याची प्रतिमा मलिन करण्याचा आणि मुस्लिम समाजाविरोधात चुकीचा समज निर्माण करण्याचा आरोप केला गेला. त्यादरम्यान आता सिनेमाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी एक मोठं वक्तव्य अख्खं सरकारच हलवून सोडलं आहे.
नुकतंच मुंबईत एका पत्रकार परिषदे दरम्यान दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी एक खुलासा करत खळबळ उडवून दिली आहे. सुदिप्तो सेन यांनी उत्तर केरळ आणि मंगळुरला दहशतवादाचा अड्डा म्हटलं आहे. ते ३२००० महिलांचे जबरदस्तीने धर्मांतर करण्याचे आणि नंतर त्यांना ISIS मध्ये दाखल करण्याच्या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देत होते.
३२ हजार पीडित महिलांच्या दाव्याविषयी आपण मोठा खुलासा करु असं देखील ते म्हणाले. तसंच,सुप्रीम कोर्टात निर्मात्यांनी वकीलांच्या माध्यमातून सांगितले की ते सिनेमावर आणखी एक डिसक्लेमर लावायला तयार आहेत.
यामध्ये स्पष्ट लिहिलं असेल की त्यांच्या सिनेमात पीडित महिलांच्या दिलेल्या आकड्याला कोणताही ठोस आधार नाही आणि या तीन मुलींच्या कथेवर आधारित हा एक काल्पनिक सिनेमा आहे. (The Kerala Story director claim that north kerala is a terror hub)
बुधवारी १७ मे रोजी मीडियासोबत संवाद साधताना सुदिप्तो सेन यांनी दावा केला की,''आम्ही जे सांगू ते ऐकून राज्य सरकार देखील भुवया उंचावू शकतो. ते म्हणाले की, केरळच्या उत्तर भागात दहशतवादाचं मुख्य केंद्र आहे. दोन केरळ आहेत. एक पोस्टकार्ड सारखं आहे ज्याच्यावर बॅकवॉटर आहे,खूप सुंदर निसर्गानं नटलेलं,कलरीपयट्टू आहे,तिथे मार्शल आर्ट आहे, हत्ती आहे''.
''हे ते केरळ आहे ज्याविषयी अख्खं जग जाणतं. पण याव्यतिरिक्त आणखी एक केरळ आहे,आणि हा राज्याचा उत्तरेचा भाग आहे. ज्यामध्ये मलप्पुरम,कासरगोड,कोझिकोड सामिल आहेत,जो मंगळुरु सहित दक्षिण कर्नाटकाशी जोडला गेलेला आहे. आणि हाच दहशतवादाचा अड्डा आहे''.
सुदिप्तो सेन यांनी पुढे दावा केला की,''केरळमध्ये मध्ये साक्षरतेचा दर अधिक आहे..या राज्यात महिला आणि मुलांच्या विकासाचा,त्यांच्या आरोग्याचा मापदडं सगळ्यात उत्तम आहे पण काही अशा गोष्टी आहेत ज्या इथे खूप चुकीच्या घडत आहेत''.
ते म्हणाले,''आमच्यासोबत वाद घालण्याऐवजी किंवा आमची खिल्ली उडवत न बसता जर तुमच्या मनात प्रश्न उठले असतील तर कोझिकोड आणि कासरगोड इथे नक्की जा आणि स्वतः पहा. सत्य समोर असेल''.
द केरळ स्टोरीचा विरोध करणारे त्याला प्रोपेगेंडा सिनेमा म्हणत आहेत. केरळमधनं महिलांच्या धर्मांतराच्या संख्येविषयी सिनेमात दावा केल्यानंतर वादाचं वादळ उठलं होतं. सिनेमाच्या टीझरमध्ये दावा केला होता की राज्यात ३२ हजार महिलांचे धर्मांतर करुन त्यांना आयएसआयएस या दहशतवादी संघटनेत दाखल केलं गेलं. पण राज्यातून फक्त ६ महिलांच्या बाबतीत असं घडल्याचा रेकॉर्ड आहे आणि यातील फक्त एक हिंदू महिला होती.
केरळचे मुख्यंमत्री पिनाराई विजयन यांनी सिनेमात सगळं खोटं सांगितलंय असं म्हटलं होतं. ते म्हणाले होते की ''केरळला जगासमोर अपमानित करण्याचा RSS चा प्रयत्न आहे. या खोट्या कहाण्यांवर सिनेमे बनवून राज्याला तोडा आणि राज्य करा ही रणनीतीचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातोय''.
पण या सगळ्या दरम्यान आता केरळ स्टोरीला मोठा दिलासा मिळाला आहे तो म्हणजे पश्चिम बंगालमध्ये सिनेमावर लागलेली बंदी उठवण्यात आली आहे. सुप्रिम कोर्टानं पश्चिम बंगालमध्ये सिनेमावरील बंदी उठवत राज्यसरकारनं बंदी घालत लावलेल्या तर्काला चुकीचं ठरवलं आहे. त्यासोबतच तामिळनाडू सरकारला देखील चोख बंदोबस्तात सिनेमा प्रदर्शित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
द केरळ स्टोरी रिलीजच्या तीन दिवसानंतर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारनं सिनेमावर बंदी आणली होती. बंदीची घोषणा करताना हा सिनेमा हिंसेचं प्रदर्शन करत आहे त्यामुळे शांती सुव्यवस्थेसाठी ही बंदी आणत असल्याचं म्हटलं होतं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.