Sudipto Sen Hospitalized News: 'द केरळ स्टोरी'चे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी आहे. सुदीप्तो सेन यांची प्रकृती अचानक बिघडली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
'द केरळ स्टोरी'मुळे सुदीप्तो सेन बऱ्याच दिवसांपासून व्यस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. व्यस्त वेळापत्रक आणि विश्रांतीचा अभाव यामुळे सुदीप्तो सेन यांची प्रकृती बिघडली.
(The Kerala Story director Sudipto Sen gets hospitalized)
सुदीप्तो सेन 'द केरळ स्टोरी'चे सतत प्रमोशन करत असून ठिकठिकाणी जात असल्याची माहिती आहे. सततच्या प्रवासामुळे त्यांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम झाला आहे.
'द केरळ स्टोरी' रिलीज झाल्यापासून वादांमुळे सुदीप्तो सेन खूप तणावाखाली असल्याचेही बोलले जात आहे. त्या वादाचा परिणाम सुदीप्तोच्या प्रकृतीवरही झाला आहे.
सुदीप्तो सेनला रुग्णालयात दाखल केल्यानंतर चित्रपटाचे प्रमोशन आणि इतर गोष्टी थांबवण्यात आल्या आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माचा चित्रपट The Kerala Story रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे.अदा शर्माच्या चित्रपटाच्या कथेवरून आतापर्यंत बरेच वाद झाले आहेत.
चित्रपटाच्या कथेमुळे अदा शर्माच्या 'द केरळ स्टोरी'वर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली आहे. नेत्यापासून ते अभिनेत्यापर्यंत सर्वजण चित्रपटाबाबत आपलं मत मांडताना दिसतात.
त्यातच उत्तरप्रदेश आणि हरियाणामध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला तर तामिळनाडू आणि पश्चिम बंगलामध्ये चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती.
त्यानंतर निर्मात्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आणि त्यानंतर गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारच्या राज्यात चित्रपटावर बंदी घालण्याच्या आदेशाला स्थगिती दिली आणि तमिळनाडूला चित्रपट पाहणाऱ्यांच्या सुरक्षेची खात्री करण्यास सांगितले.
आता त्यानंतर अदा शर्माचा चित्रपट सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये दाखवला जात आहे. वृत्तानुसार, थिएटर अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की ते आधीच बुक केलेले स्लॉट रद्द करू शकणार नाहीत
आणि दोन किंवा तीन आठवड्यांनंतर सुदीप्तो सेन दिग्दर्शित चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सुदीप्तो सेन काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मनोरंजन विश्वात सक्रीय होतील अशी चाहत्यांना आशा आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.