The Kerala Story Actress Adah Sharma Marathi Post of Mothers Day: सध्या द केरळ स्टोरी सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सिनेमातील सर्वच अभिनेत्रींवर प्रेक्षकांनी प्रेम केलंय. या सर्व अभिनेत्रींच्या अभिनयाचं देशभरात कौतुक होतंय.
अशातच द केरळ स्टोरी मधली मुख्य अभिनेत्री अदा शर्मा हिचं आजच्या मदर्स डे निमित्त अस्सल मराठमोळं कनेक्शन समोर आलंय.
अदाने सोशल मीडियावर आई आणि नानी सोबतचा फोटो शेयर करत मराठीत मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्यात.
(the kerala story fame actress adah sharma marathi post of mothers day)
अदाने तिच्या सोशल मीडियावर नानी, आई आणि द केरळ स्टोरी सिनेमात तिच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीसोबतचे खास फोटो पोस्ट केलेत.
अदा लिहिते... या वर्षी रील आणि रियल दोन्ही आईंना #happymothersday.. या मातृदिनाला #TheKeralaStory सोबत ब्लॉकबस्टर बनवल्याबद्दल माझ्या रील आणि वास्तविक जीवनातील आई आणि पाटी/नानी/आमूमांकडून खूप खूप धन्यवाद....
जगभरातील माता आणि मुलींना ज्यांनी मला प्रेम पाठवलं आहे !! थँक यू , धन्यवाद माझा मदर्स डे त्यामुळे स्पेशल बनवल्याबद्दल.. फॅन्सचे खूप आभार..
माझी नानी तुम्हाला सर्वांना virtual डोसा और payasam पाठवत आहे. अशी पोस्ट लिहीत अदाने मदर्स डेच्या शुभेच्छा देताना खास मराठी भाषेचा वापर केलाय.
यंदाच्या वर्षातील सर्वाधिक चर्चेतील चित्रपट म्हणून द केरळ स्टोरीचा उल्लेख करावा लागेल. या चित्रपटानं आठवड्याभरात १०० कोटींची कमाई केली आहे. सोशल मीडियावर या चित्रपटावरुन वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होत आहेत.
काहींनी त्याचे कौतूक केले आहे. तर काहींनी हा चित्रपट प्रोपगंडा असल्याचे म्हटले आहे. आता भारताबाहेर अमेरिका, कॅनडा सारख्या देशांमध्ये केरळ स्टोरी पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत असल्याची बातमी समोर आली आहे.
अमेरिका, कॅनडामध्ये १२ मे रोजी द केरळ स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. परदेशात २०० हून अधिक स्क्रिन्सवर प्रेक्षकांना केरळ स्टोरी पाहता येणार आहे.
याविषयी प्रतिक्रिया देताना दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी म्हटले आहे की, ही आमच्यासाठी खूप आनंदाची बाब असून प्रेक्षकांचा चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद सकारात्मक आहे.
आमच्यासाठी हे खास ध्येय होतं ज्यात आम्ही यशस्वी होत आहोत. ही समाधानाची गोष्ट असल्याचे सेन यांनी म्हटले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.