Adah Sharma : केरळ स्टोरीची 'अदा' पुण्यात आली, पुणेकरांना म्हणाली...
The Kerala Story Movie Actress Adah Sharma Pune : द केरळ स्टोरी हा विषय सध्या चर्चेत आला आहे. याच नावानं प्रदर्शित झालेला चित्रपट देशभरामध्ये वादाचा मुद्दा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयापर्यत केरळ स्टोरीवरुन झालेला वाद पोहचला. तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल राज्यांमध्ये या चित्रपटावरील प्रदर्शनावर असलेली बंदी उठवण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयानं तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांना चांगलेच फटकारले होते. तुम्ही हा चित्रपट का प्रदर्शित करत नाही, साऱ्या देशभर या चित्रपटाचे शो होत असताना तुमच्याकडे त्याला विरोध होण्याचे कारण काय असा प्रश्न यावेळी कोर्टानं विचारला होता. आता तर केरळ स्टोरीची टीम पुण्यात दाखल झाली आहे. त्यांनी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये केरळ स्टोरीविषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत.
Also Read - Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!
यासगळ्यात केरळ स्टोरीमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या अदा शर्माची पुण्यात इंट्री झाली आणि त्याची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे अदानं तिच्या खास शैलीत पुणेकरांना केरळ स्टोरीच्या निमित्तानं या चित्रपटाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानले आहेत. त्यांना धन्यवादही दिले आहेत.
यापूर्वी पुण्यातील एफटीआयआय संस्थेमध्ये द केरळ स्टोरीचे स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. त्याला संस्थेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता. आपण काही केल्या त्या स्क्रीनिंगला उपस्थित राहणार नाही. असा आक्रमक पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला होता. यात विद्यार्थ्यांनी हा चित्रपट पाहावा त्यानंतर आम्ही बोलू अशी भूमिका आयोजकांनी घेतली होती. तुम्ही हा चित्रपट न पाहता त्यावर टीका कशी काय करता असा प्रश्न निर्मात्यांचा होता.
आता अदा शर्माच्या एका पोस्टनं लक्ष वेधून घेतले आहे. त्यात तिनं पुण्यातील काही संस्थामधील फोटो शेयर केले आहेत. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमा दरम्याचे फोटो शेयर करुन तिनं पुणेकरांचे आभार मानले आहेत. पुणेकर तुम्हा सर्वांना खूप प्रेम...अशा शब्दांत अदानं भावना व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.