The Kerala Story: आठवडाभरात किती लोकांनी पाहिला 'द केरळ स्टोरी'? दिग्दर्शक म्हणतो...

Adah Sharma film The Kerala Story
Adah Sharma film The Kerala Story Esakal
Updated on

तीन मुली ज्या आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात येतात. स्वप्न पुर्ण करण्याची इच्छा ठेवुन कॉलेजला प्रवेश करतात. तिथे हॉस्टेलला राहतात. मात्र त्याच्यासोबत तिथे काय होणार आहे. त्याच्या आयुष्याला पुढे किती भयानक वळण येणार आहे याची त्यांना थोडीही कल्पना नसते.

तिथली एक आपा त्यांना शब्दात त्यांची दिशाभुल करते आणि ब्रेन वॉश करुन त्यांना धर्मांतरण करण्यास भाग पाडते. हे तर काहीच नाही यापेक्षा भयावह प्रसंग त्याच्या आयूष्यात घडतात. सत्य घटनांवर आधारित सांगण्यात आलेली भयानक कहानी जी लव जिहाद, धर्मांतर, आतंकवाद आणि ब्रेनवॉश , लैंगिक छळ अशा अनेक मुद्यावर भाष्य करते ती कहानी म्हणजे 'द केरळ स्टोरी'.

Adah Sharma film The Kerala Story
Gauahar Khan: वयाच्या चाळिशीत गौहर खान बनली आई! घरी नव्या पाहुण्याचे आगमन! फोटो व्हायरल

प्रसिद्ध दिग्दर्शक सुदिप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट मोठ्या वादाच्या भोवऱ्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. 'द केरळ स्टोरी' रिलीज होऊन सात दिवस झाले आहेत. हा चित्रपट जबरदस्त कलेक्शन केले आहे. आता प्रयत्न या चित्रपटाने 80 कोटींचा टप्पा गाठला आहे. लवकरच हा चित्रपट शंभर कोटींच्या क्लबमध्ये सामिल होईल अशी आशा निर्मात्यांना आहे.

Adah Sharma film The Kerala Story
The Kerala Story BO: जितका वाद तितकी कमाई! द केरळ स्टोरी शंभर कोटींचा टप्पा गाठणार..

सोशल मीडियावर 'द केरळ स्टोरी'ला पाठिंबा मिळत आहे तर काही लोक या चित्रपटाला प्रोपगंडा म्हणत त्यावर टिका करत आहेत. तर दुसरीकडे या चित्रपटाला मिळत असलेले प्रेम पाहता चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांना खुप आनंद झाला आहे. सुदीप्तो सेन यांनी नुकतच चित्रपटाबद्दल एक ट्विट शेअर केले आहे. यामध्ये चित्रपटाच्या नवीन कामगिरीबद्दल लिहिले आहे.

सुदीप्तो सेन यांनी शेअर केलेल्या ट्विटनुसार, 'द केरळ स्टोरी' भारतात आतापर्यंत 60 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. गुरुवारपासून नवा अध्याय सुरू होत आहे. केरळ स्टोरी 40 हून अधिक देशांमध्ये एकाच वेळी रिलीज होत आहे... अधिकाधिक संख्येत भर पडत आहे. आम्ही आशीर्वाद, प्रेम आणि कौतुकाने भारावून गेलो आहोत.

Adah Sharma film The Kerala Story
Imran Khan : पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांनी देशभक्ती दाखवण्यासाठी लावलं काश्मिर फाईल्सचं गाणं!

या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाल्यानंतर चित्रपटाच्या कथानकावरून बराच गदारोळ झाला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी या चित्रपटावर बंदी घालाण्याची तर काही ठिकाणी हाकरमुक्त करण्याची मागणी केली जात होती.

तर या चित्रपटात 'द केरळ स्टोरी'मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्रींबद्दल सांगायच झालं तर द केरळ स्टोरीमधील कलाकार अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बलानी, सिद्दी इदनानी यांनी दमदार भूमिका केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()