The Kerala Story : 'नसिरुद्दीन शाह यांची नियतच खोटी',भाजपच्या मनोज तिवारींचा संताप!

'घरात बसून काहीही बोलणं सोपंय नसिरुद्दीनजी'! भाजपचे मनोज तिवारींनी शाह यांच्यावर आगपाखड केली आहे.
The Kerala Story Naseerddin Shah Comment BJP Manoj Tiwari
The Kerala Story Naseerddin Shah Comment BJP Manoj Tiwari
Updated on

Manoj Tiwari, Naseeruddin Shah, The Kerala Story : बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्दीन शहा हे त्यांच्या प्रभावी भूमिकांसाठी ओळखले जातात. केवळ अभिनयच नाही तर वेगवेगळ्या सामाजिक कामांमध्ये देखील त्यांचा सक्रिय सहभाग असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी नसिरुद्धीन शाहा हे त्यांच्या वक्तव्यामुळे अडचणीत आले होते. आता ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून द केरळ स्टोरीनं मोठ्या चर्चेला उधाण आले आहे. त्यावर आतापर्यत वेगवेगळ्या बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. त्यात प्रख्यात अभिनेते नसिरुद्दीन शाहा यांच्या नावाची भर पडली आहे. त्यानंतर प्रसिद्ध अभिनेते आणि भाजपचे नेते मनोज तिवारी यांनी शहा यांच्यावर आगपाखड केली आहे. त्यांनी तीव्र शब्दांत शहा यांच्या वक्तव्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

Also Read - Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!

केरळ स्टोरीला मिळालेल्या प्रतिक्रिया संमिश्र स्वरुपाच्या आहेत. यासगळ्यात शाहा यांच्या प्रतिक्रियेनं लक्ष वेधून घेतले आहे. शाहा यांनी म्हटले आहे की, कोणत्याही कलाकारांनी द केरळ स्टोरी सारख्या विषयांवरील चित्रपटाचा भाग होऊ नये. यासगळ्यात शहा यांनी केरळ स्टोरी सारखा चित्रपट अद्याप पाहिला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर भोजपूरी कलाकार आणि बीजेपीचे खासदार मनोज तिवारींची जळजळीत प्रतिक्रिया समोर आली आहे.

तिवारी यांनी म्हटले आहे की, नसिरुद्दीन शहा यांची नियतच खोटी आहे. ते भलेही चांगले कलाकार आहेत मात्र त्यांची विचारसरणी ही चांगली नाही. जर शाह यांना द केरळ स्टोरीची अॅलर्जी आहे किंवा त्यांच्याशी संबंधित काही शंका आहे तर ते कोर्टात जाऊ शकतात. असेही तिवारी यांनी म्हटले आहे.तिवारी यांची ती पोस्ट व्हायरल झाली आहे. केरळ स्टोरी हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. अनेक पीडितांनी त्याविषयी कोर्टात धाव घेतली आहे.

The Kerala Story Naseerddin Shah Comment BJP Manoj Tiwari
The Kerala Story: सुकलेले ओठ अन् त्याला पडलेल्या जखमा... शूटिंगदरम्यान अदाची झालेली भयानक अवस्था

इंडियन एक्सप्रेसशी बातचीत करताना शाह यांनी म्हटले होते की, अफवाह, भीड आणि फराज सारखे चित्रपट बॉक्सऑफिसवर चालत नाहीत. आणि केरळ स्टोरीसारखा चित्रपट चालतो. त्यामुळे आपण काय बोलणार, मी अजून हा चित्रपट पाहिलेला नाही. आणि तो मला पाहण्याची इच्छाही नाही. असे ते म्हणालेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.