The Kerala Story
The Kerala Story esakal

The Kerala Story : केरळ स्टोरीला OTT प्लॅटफॉर्म का मिळेना? खरं कारण आलं समोर...

सुदीप्तो सेन यांनी काही दिवसांपूर्वी केरळ स्टोरीला ओटीटीवर घेण्यासाठी कुणीही पुढे येत नसल्याचे सांगितले होते.
Published on

The Kerala Story OTT Rights Not Getting Buyer : प्रसिद्ध दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांचा द केरळ स्टोरीनं सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. हिंदू - मुस्लिम धर्मांतर या विषयावर आधारित या चित्रपटानं देशभरामध्ये वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर सोशल मीडियावर या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा होती. गेल्या काही दिवसांपासून केरळ स्टोरी आणि ओटीटी हा चर्चेचा विषय आहे.

सुदीप्तो सेन यांनी काही दिवसांपूर्वी केरळ स्टोरीला ओटीटीवर घेण्यासाठी कुणीही पुढे येत नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर पुन्हा संबंधित ओटीटी प्लॅटफॉर्मच्याविरोधात वादाला सुरुवात झाली होती. तो वाद नेमका कशामुळे झाला होता याविषयी उलट सुलट चर्चा सुरु होत्या. नेटकऱ्यांनी देखील केरळ स्टोरीला नेमका कशामुळे विरोध होतो आहे असा प्रश्न उपस्थित केला होता. आता मात्र त्याचे खरे कारण समोर आले आहे. त्यातून नवीन माहिती उघड झाली आहे.

केरळ स्टोरीच्या निर्मात्यांनी यापूर्वी चित्रपटाच्या प्रमोशनासाठी जे काही करता येईल त्यासगळ्या गोष्टी केल्या. अनेक ठिकाणी जाऊन पत्रकार परिषदा घेतल्या. पुण्यातही त्यांनी एफटीआयआयमध्ये जाऊन केरळ स्टोरीचे स्क्रिनिंग घेतले होते. त्याला मात्र विद्यार्थ्यांनी विरोध केला होता. त्याची सोशल मीडियावर चर्चा झाली होती. यानंतर काही दिवसांनी केरळ स्टोरी ओटीटीवर येणार अशी चर्चा असताना त्याला ओटीटी मालक मिळेना अशी चर्चा होती.

आता केरळ स्टोरीच्या मेकर्सचा खोटेपणा समोर आला आहे. यापूर्वी मेकर्सनं इंडस्ट्रीतील काही लोकांनी केरळ स्टोरीच्या विरोधात कटकारस्थान रचत असल्याचा आऱोप केला होता. त्यांच्यामुळे आमच्या चित्रपटाला ओटीटीवर विकत घेतले जात नाही. मात्र खरे कारण वेगळेच आहे. वास्तविक केरळ स्टोरीच्या मेकर्सला ओटीटीकडून जास्त पैशांची अपेक्षा आहे. त्यांना जी किंमत अपेक्षा आहे त्यापेक्षा कमी किंमतीत काही जण त्या राईट्सची खरेदी करत आहे. जे मेकर्सला मान्य नाही.

The Kerala Story
Adipursh: 'रावणाच्या कपाळावर गंध का नाही'? हिंदू महासभा भडकली!

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळ स्टोरीच्या मेकर्सनं काही ओटीटीकडे ७० ते १०० कोटींची मागणी केली आहे. चित्रपटाचे बजेट ४० कोटी रुपये असून आतापर्यत या चित्रपटानं दोनशे कोटींहून अधिक कमाई केली आहे. अशातच ओटीटीवर एवढी किंमत मिळेल याची शक्यता कमी असल्याचे दिसून आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.