The Kerala Story Real Things Interview of suffers girl join ISIS : मला आता हे सगळं सोडायचं आहे. जे काही झालं ते झालं. आता पुन्हा त्या गोष्टींकडे जायचे नाही. हे शब्द होते माझ्या पतीचे. त्यानं शेवटी हे मला सांगितलं होतं. तिथे कोणतीही मस्जिद नाही. तिथे काहीही आलबेल नाही. सगळं काही खोटं आहे. केरळ स्टोरी ज्या व्यक्तिरेखेवर आधारलेली आहे. त्या सोनियानं एका मुलाखतीमध्ये हे सांगितलं आहे.
आयएसची नजर चुकवून ती अफगाणिस्तानमध्ये पळून गेली. असं म्हटलं जातंय की, द केरळ स्टोरीमध्ये तिची कथा सांगण्यात आली आहे. सध्या या चित्रपटानं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटर बाहेर गर्दी करु लागले आहेत. दिग्दर्शक सुदिप्तो सेन आणि विपुल अमृतलाल शहा यांच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. देशामध्ये द केरळ स्टोरीवरुन मोठा वाद झाला आहे.
Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
अनेकांनी या चित्रपटाच्या विरोधात आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. संमिश्र प्रतिक्रिया मिळालेल्या या चित्रपटाला मात्र प्रेक्षकांकडून हिरवा कंदील मिळत आहे. या चित्रपटामध्ये त्या तीन मुलींची गोष्ट सांगण्यात आली ज्या इसिसच्या प्रभावात येऊन दहशतवादाच्या वाट्यावर चालल्याचे दिसून आले आहे. हा चित्रपट सोनिया सेबेस्टिनय उर्फ आयशा, निमिशा उर्फ फातिमा इसा, मरिन उर्फ मरियम आणि रफीला. या मुली इसिसच्या तावडीत सापडल्या. त्यानंतर त्या २०१६ ते २०१८ च्या दरम्यान पतीसोबत अफगाणिस्तानात निघून गेल्या.
सोनिया सेबेस्टियन ही मुळची ख्रिश्चन धर्मातली. तिला इसिसचा समर्थक अब्दुला राशिदनं आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. सोनियानं तिचा धर्म बदलून नावं ठेवलं आयशा, २०११ मध्ये त्यांनी लग्न केलं. राशिदनं तिला वेगवेगळी स्वप्नं दाखवली आणि शरियाचा संदर्भ देत येणारे दिवस किती आनंदाचे सुखाचे समृद्धीचे असतील हे सांगितले. सोनियाला असं सांगण्यात आलं होतं की, भारतात शरियत कायदा नाही. त्यामुळे तिला आता इस्लामिक स्टेटमध्ये जावं लागेल. त्यानंतर ती २०१६ मध्ये अफगाणिस्तामध्ये पतीसोबत आली.
तीन वर्षांपूर्वी स्टारन्युज ग्लोबलनं त्या तीन मुलींशी बातचीत केली होती. त्यात सोनियानं सांगितलं होतं की, मला इस्लाम धर्मानुसार आयुष्य व्यतीत करायचे आहे. सोनियाच पती २०१९ च्या अमेरिकी हल्ल्यात मारला गेला. त्यानं आत्मसमर्पण केलं होतं. त्या मुलाखतीमध्ये त्यानं खूप धक्कादायक खुलासेही केले होते. मी आणि माझा पती आम्ही जो विचार करुन अफगाणिस्तामध्ये आलो होतो तसे येथे काहीही नव्हते. कोणतीही मशिद नाही. कोणतीही व्यवस्था नाही. मी खरं सांगते हे पाहून मला पुन्हा भारतात यावेसे वाटले.
सोनियानं त्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, मला मी जे काही केले त्याचा पश्चाताप होतो आहे. आम्हाला लोकांना मारायला आवडतं म्हणून आम्ही काही इसिस जॉईन केलेलं नाही. आम्हाला फक्त इस्लामिक पद्धतीनं आयुष्य जगायचं होतं. माझ्या पतीनं देखील सगळ्या गोष्टी सोडून दिल्या होत्या. तो अफगाणिस्तानमध्ये आल्यावर खूप निराश झाला होता. त्याला सगळे काही सोडून द्यायचे होते. एक पत्नी म्हणून तो कशाप्रकारे मोडून पडला होता. हे मला जाणवले. तो खूप दु:खी झाला होता.
२०१९ मध्ये जेव्हा अब्दुला राशिदमारला गेला तेव्हा सोनियाच्या डोकेदुखीत वाढ झाली होती. आम्ही फक्त एका जागेवरुन दुसऱ्या जागी फिरत होतो. आमचं जगणं खूप वाईट झालं होतं. २०१७ मध्ये सोनियाच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जाहीर करण्यात आली. ती सध्या अफगाणिस्तानच्या तुरुंगात आहे. भारतानं देखील तिच्या बाजुनं निर्णय घेण्यास कोणतीही सकारात्मकता दर्शवली नाही. असे सोनियाचे म्हणणे आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.