The Kerala Story in West Bengal: दीदींच्या बंगालमध्ये 'द केरळ स्टोरी' रिलिज होताच हाउसफुल

The Kerala Story in West Bengal:
The Kerala Story in West Bengal:Esakal
Updated on

The Kerala Story in West Bengal:  बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माचा चित्रपट The Kerala Story रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे.अदा शर्माच्या चित्रपटाच्या कथेवरून आतापर्यंत बरेच वाद झाले आहेत. चित्रपटाच्या कथेमुळे अदा शर्माच्या 'द केरळ स्टोरी'वर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली आहे. नेत्यापासून ते अभिनेत्यापर्यंत सर्वजण चित्रपटाबाबत आपलं मत मांडताना दिसतात.

The Kerala Story in West Bengal:
Nitesh Pandey Last Post: 'बिखरने का मुझको...',नितेशचा 'तो' व्हिडिओ ठरला शेवटचा! पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

त्यातच उत्तरप्रदेश आणि हरियाणामध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला तर तामिळनाडू आणि पश्चिम बंगलामध्ये चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती.

त्यानंतर निर्मात्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आणि त्यानंतर गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारच्या राज्यात चित्रपटावर बंदी घालण्याच्या आदेशाला स्थगिती दिली आणि तमिळनाडूला चित्रपट पाहणाऱ्यांच्या सुरक्षेची खात्री करण्यास सांगितले.

आता त्यानंतर अदा शर्माचा चित्रपट सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये दाखवला जात आहे. वृत्तानुसार, थिएटर अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की ते आधीच बुक केलेले स्लॉट रद्द करू शकणार नाहीत आणि दोन किंवा तीन आठवड्यांनंतर सुदीप्तो सेन दिग्दर्शित चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

The Kerala Story in West Bengal:
Nitesh Pandey Death: हॉटेल रुममध्ये बेशुद्धावस्थेत सापडला होता नितेश! पोलिस म्हणतायत...

बंगालमधील बहुतेक थिएटरने द केरळ स्टोरी प्रदर्शित करण्यास नकार दिला असताना, उत्तर 24 परगणा 'बनगाव'मधील सिंगल स्क्रीनने चित्रपट दाखवण्यास सुरुवात केली आहे.

रिपोर्ट्सनुसार, त्या थिएटरमध्ये जवळपास सगळेच शो हाऊसफुल्ल आहेत आणि त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, The Kerala Story चे संगीत दिग्दर्शक, बिशाख ज्योती, मूळचे बोनगावचे आहेत आणि हे जाणून खूप उत्सुक आहेत की सर्व वाद आणि कथित धमकीचे कॉल येत असूनही श्रीमा हॉल 'द केरळ स्टोरी' दाखवत आहे.

The Kerala Story in West Bengal:
Kangana Ranaut: अक्षय पाठोपाठ कंगनाही केदारनाथला बाबांच्या चरणी नतमस्तक

केरळमधील 32,000 हिंदू महिलांना जबरदस्तीने इस्लाममध्ये धर्मांतरित केल्याच्या संशयास्पद दाव्यामुळे चित्रपटाची कथा वादात अडकली होती. पण तरीही ते पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुकतेने चित्रपटगृहांमध्ये पोहोचत आहेत आणि चित्रपटाला प्रतिसाद मिळत आहे.

चित्रपटाच्या कलाकारांबद्दल बोललो तर, अदा व्यतिरिक्त, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी देखील चित्रपटात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.