The Kerala Story च्या वादात ए. आर. रेहमानची उडी! केरळमधील मशिदीतला हिंदू विवाहचा व्हिडिओ केला शेअर ..

ऑस्कर-विजेता संगीतकार ए आर रहमानने 4 मे रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
 The Kerala Story, The Kerala Story news, The Kerala Story movie review
The Kerala Story, The Kerala Story news, The Kerala Story movie reviewSAKAL
Updated on

The Kerla Story A R Rehman Shares Video News: द केरला स्टोरी या चित्रपटाभोवती सध्या मोठा वाद सुरु आहे. द केरला स्टोरी सिनेमा आज प्रदर्शित झालाय.

द काश्मीर फाईल्स नंतर द केरला स्टोरी हा असा सिनेमा आहे ज्यावर संपूर्ण देशभरात मोठी चर्चा सुरु आहे.

आता द केरला स्टोरी च्या वादाला मोठं वळण लागलं आहे. ते म्हणजे ऑस्कर विजेता ए. आर. रेहमानने द केरला स्टोरीच्या प्रकरणात उडी घेतलीय.

(The Kerala Story row AR Rahman shares video of Hindu wedding inside mosque, says ‘love for humanity…’)

 The Kerala Story, The Kerala Story news, The Kerala Story movie review
Gulshan Kumar Birthday: वैष्णोदेवीचे भक्त गुलशन कुमार यांच्या मृत्यूनंतरही त्यांचा मुलगा मंदिरात करतो 'हे' काम

ऑस्कर-विजेता संगीतकार ए आर रहमानने 4 मे रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओत केरळमधील मशिदीमध्ये हिंदू विवाह होताना दिसतोय. हा व्हिडिओ ट्विट करत ए. आर. रहमानने लिहिले, "मानवतेवरचं प्रेम हे बिनशर्त आणि भरभरुन असावं."

काय आहे या व्हिडिओत?

1 मिनिट आणि 47 सेकंदाची या व्हिडिओमध्ये केरळमधील अलाप्पुझा शहरातील एका मशिदीत एक हिंदू जोडपे लग्न करताना दिसत आहे.

अंजु आणि शरद असं या जोडप्याचं नाव आहे. मशिदीत असूनही त्यांनी सर्व हिंदू विधीनुसार लग्न केलं.

व्हिडिओनुसार, आर्थिक अडचणीत असलेल्या वधूच्या आईने आपल्या मुलीच्या लग्नासाठी मदतीसाठी मशिदीच्या समितीकडे संपर्क साधला होता.

तेव्हा मशीद समितीने मुलीला २० लाख रुपये आणि १० सोन्याचे दागिने दिले. या लग्नाचं सध्या सगळीकडून खुप कौतुक होतंय.

दरम्यान द केरला स्टोरी वर बंदी घालण्याची याचिका दाखल करण्यात आली होती. पण सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळली असून चित्रपटाच्या बंदीचा निर्णय बेकायदेशीर असल्याचं म्हटलं असून यात सुप्रीम कोर्ट कोणताही हस्तक्षेप करणार नाही, असं म्हटलं आहे.

याशिवाय CBFC ने अभिनेत्री अदा शर्माच्या या चित्रपटात एक-दोन नव्हे तर 10 कट केले आहेत आणि 'ए' प्रमाणपत्रासह चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी दिली आहे. द केरला स्टोरी ५ मे ला रिलीज झालाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.