The Kerala Story Teaser: विपुल अमृतलाल शाह आपला आगामी चित्रपट 'द केरळ स्टोरी' प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी सज्ज आहेत. केरळ राज्यात बेपत्ता झालेल्या ३२,००० महिलांमागील सत्य घटनेवर आधारित असून, 'द केरळ स्टोरी'चा टीझर प्रभावी आणि सत्य कथेवर आधारित असल्याचे दर्शवतो. विपुल शाह निर्मित आणि सुदिप्तो सेनद्वारा दिग्दर्शित हा चित्रपट एका दहशतवादी संघटनेने केलेल्या महिलांच्या तस्करीची हृदयद्रावक आणि धक्कादायक कथा समोर आणतो. (The Kerala Story- Teaser release, Vipul Amrutlal Shah)
चित्रपटाच्या साध्या पण धक्कादायक टीझरमध्ये एका महिलेची कहाणी पाहायला मिळेल जिची भूमिका अदा शर्मा साकारताना दिसेल. या मुलीचे नर्स बनण्याचे स्वप्न होते, परंतु तिचे घरातून अपहरण करण्यात आले जी आयएसआयएस दहशतवादी म्हणून अफगाणिस्तानमध्ये जेरबंद आहे.
जिथे बहुतांश लोक अशा विषयांपासून दूर जातात, तिथेच निर्माते विपुल अमृतलाल शाह यांनी ४ वर्षांच्या व्यापक आणि सखोल संशोधनासह ही भयानक कथा मोठ्या पडद्यावर आणण्याचा निर्धार केला होता. दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी राज्यासह अरब देशांतही प्रवास केला. स्थानिक लोक आणि पीडितांच्या कुटुंबियांना भेट घेत मिळालेल्या निष्कर्षांना जाणून घेतल्यानंतर दिग्दर्शकही हादरला होता असं त्यानं सांगितलं.
आपल्या विधानात विपुल शाहने शेअर केले होते की, "मी पहिल्या कथनाच्या बैठकीतच माझे डोळे पाणावले."
नुकत्याच झालेल्या तपासणीनुसार, २००९ पासून - केरळ आणि मंगळुरूमधील हिंदू आणि ख्रिश्चन समुदायातील सुमारे 32,000 मुलींचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले असून, त्यापैकी बहुतांश सीरिया, अफगाणिस्तान आणि इतर आयएसआयएस आणि हक्कानी प्रभावशाली भागात आहेत. या महिलांची वेदनादायक आणि सत्य कथा या चित्रपटामार्फत पाहायला मिळेल.
सिनेमाच्या माध्यमातून अनेक सत्य गोष्टी विपुल अमृतलाल शाह 'द केरळ स्टोरी'द्वारे समोर आणणारअसून, हा चित्रपट पुढच्या वर्षी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.