The Kerala Story Update: 'द केरळ स्टोरी'ची कथा सत्यच.. धर्मांतर झालेल्या पीडित मुली अखेर कॅमेऱ्यासमोर..

'द केरळ स्टोरी'चे दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी पत्रकार परिषद घेत २६ पीडित मुलींना कॅमेऱ्यासमोर आणले अन् तिथे काही दावे देखील केले गेले.
The Kerala Story Update
The Kerala Story UpdateInstagram
Updated on

The Kerala Story Update: सुदिप्तो सेनच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'द केरळ स्टोरी' सिनेमाची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा आहे. सिनेमात केरळच्या तीन मुलींची कहाणी दाखवण्यात आली आहे,ज्यांचे धर्मांतर केले जाते.

सिनेमात दावा केला आहे की असं जवळपास केरळच्या ३२ हजारपेक्षा अधिक मुलींसोबत झालं आहे. त्यांचा धर्म बदलून त्यांना दहशतवादी संघटना आयएसआयएस मध्ये सामिल केलं गेलं होतं.(The Kerala Story Update Real life victims of conversion sudipto sen press conference)

The Kerala Story Update
Shekhar Suman: 'का तुटलं कंगनाचं अध्ययन सुमनशी नातं?', शेखर सुमन खुलासा करत म्हणाले, 'चूक तिची नव्हती तर ..'

जेव्हापासून हा सिनेमा रिलीज झाला त्याच्यानंतर सिनेमात केल्या गेलेल्या दाव्यावरनं अनेक प्रश्न उठवले गेले. सिनेमाला प्रोपोगेंडा म्हटलं गेलं. पण सिनेमागृहात याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

यादरम्यान १७ मे रोजी सिनेमाचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली,जिथे ते अर्थ विद्या समाजम संस्थेच्या जवळपास २६ मुलींना घेऊन समोर आले. त्यांनी दावा केला आहे की या सगळ्या मुलींचे धर्मांतर झाले होते.

The Kerala Story Update
Hansika Motwani: हार्मोनल इंजेक्शन घेऊन मोठी झालीय का हंसिका मोटवानी?..

पत्रकार परिषदे दरम्यान सुदिप्तो सेन यांनी धर्मांतराचा सामना केलेल्या श्रुती नावाच्या मुलीचा उल्लेख केला. ते म्हणाले की, जेव्हा ते मुलाखतीसाठी श्रुतीच्या घरी गेले तेव्हा तिथे लाइट नव्हती.

जेव्हा त्या बाजारातून भाजी घेऊन यायच्या तेव्हा त्यांच्या हातातील बॅगा खेचून घेतल्या जायच्या. सुदिप्तो यांनी श्रुती विषयी म्हटलं की ते लोक काही न खाता-पिता आणि वीजेविना दिवस काढायचे.

पत्रकार परिषदे दरम्यान मेकर्सनी अनेक पीडित मुलींना समोर आणलं. त्यांच्यापैकी एका मुलीनं सांगितलं की तिला रोज असे ५ ते १० कॉल येतात ज्यामध्ये लोक सांगतात की त्यांच्या कुटुंबात मुलींसोबतच नाही तर मुलांसोबत देखील हे होत आहे.

सुदिप्तो सेन यांनी ज्या श्रुती नावाच्या मुलीचा उल्लेख केला तिनं देखील पत्रकार परिषदे दरम्यान भाष्य केलं आणि म्हटलं की 'द केरळ स्टोरी' सिनेमानंतर जगातील कानाकोपऱ्यातून तिला कॉल येतायत आणि मुलं-मुली यांच्यासोबतच त्यांचे कुटुंबिय देखील सांगतायत की त्यांच्यासोबतही असं घडलं आहे.

The Kerala Story Update
Shruti Haasan: कट्यार काळजात घुसली..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.