Ramayan Movie News : रामायणावर आधारित 'जपानी' चित्रपटावर भारतात का घातली गेली बंदी?

अयोध्येत सध्या राम मंदिराचे उद्घघाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्सव सुरु (Ayodhya Ram Madir Latest News) आहे.
Japanese film based on Ramayana had to be banned in India
Japanese film based on Ramayana had to be banned in Indiaesakal
Updated on

Japanese film based on Ramayana had to be banned in India : अयोध्येत सध्या राम मंदिराचे उद्घघाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्सव सुरु (Ayodhya Ram Madir Latest News) आहे. त्याला देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असल्याचे दिसून आले आहे. राजकीय, (Ram Mandir Inauguration) सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आल्याचे दिसून आले.

सध्या सोशल मीडियावर प्रभु श्रीराम, त्यांच्याबद्दलच्या आठवणी, प्रेरणादायी (Ramayan Based Movie) प्रसंग, त्यांच्यावर आधारित पुस्तके, मालिका आणि चित्रपट यावर वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट चर्चेत आल्या आहेत. अशातच रामायणावर आधारित जपाननं तयार केलेल्या चित्रपटावर भारतात (Japanese Movie On Ramayan) का बंदी घातली गेली होती, याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

केवळ भारतच नाही तर जगभरातील विविध देशांमध्ये प्रभु श्रीराम यांचे (Latest Entertainement News) भक्त आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्युयॉर्कच्या टाईम स्क्वेअरवर देखील श्रीरामाचा फोटो झळकलेला दिसला यावरुन श्रीरामाची जगभर असलेली ख्याती दिसून येते. राम आणि रामायण यावर आधारित नाटकं, चित्रपट याला चाहत्यांचा, प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. राममंदिर प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं आपण त्या कलाकृतींची माहिती घेणार आहोत.

असं म्हटलं जातं की, जपानी दिग्दर्शक युको सको १९८३ हे भारतात आले होते. त्यावेळी त्यांना रामायणाविषयी कळलं. त्यांनी आणखी सखोलपणे रामायणाविषयी माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यांनी रामायणाचे वेगवेगळे १० प्रकार वाचून काढले. त्यात संशोधन केले आणि त्यावर चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला.

Japanese film based on Ramayana had to be banned in India
Significance of Ramayana in Indian Culture : काय आहेत भाषावार रुजलेली लोकप्रिय बारा रामायणे? लोकसंस्कृतीत रुजलेला 'राम!

युको सको यांच्या चित्रपटाचे नाव होते 'रामायण - द लिजेंड ऑफ प्रिन्स रामा' ही एक अॅनिमेटेड फिल्म होती. मात्र त्याला विश्व हिंदू परिषदेनं विरोध केला होता. देवाला कार्टूनच्या रुपात दाखवलं जाऊ नये अशी परिषदेची भूमिका होती. मात्र यावेळी युगो साको यांनी त्यांना असा विश्वास दाखवला होता की, आम्ही कोणत्याही प्रकारे भारतीयांच्या भावना दुखावल्या जाऊ देणार नाही.

अशी भूमिका घेतल्यानंतर युको सको यांना ती फिल्म तयार करण्याची परवानगी मिळाली होती. हा एक मोठा प्रोजेक्ट होता. त्यात ४५० आर्टिस्ट होते. यावेळी त्यांनी अरुण गोविल यांना व्हाईस ओव्हरसाठी संपर्क केला होता. रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत गोविल यांनी श्रीरामाची भूमिका साकारली होती. त्यांनी या चित्रपटासाठी आवाज दिला. हा चित्रपट तयार झाला आणि तितक्यात भारतात बाबरी मशिदीचा वाद सुरु झाला.

Japanese film based on Ramayana had to be banned in India
Ramayan Movie: आता आलीया - रणबीर होणार राम - सीता, तर रावण.. नितेश तिवारीचा रामायणावर नवा सिनेमा

बाबरी मशीद प्रकरण याचा मोठा फटका युगो साका यांना बसला. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित केला होता. २०२२ मध्ये युगो साको यांनी मोदींची भेट घेतली होती. आणि त्यांनी आपला चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करावा अशी मागणी मोदींकडे केली होती. हा चित्रपट जपानी भाषेशिवाय इंग्रजी आणि हिंदीमध्ये तयार केला गेला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.