The Lost Prime Minister:सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं रहस्य समोर आणते ही सीरिज.. सत्य घटना हैराण करतील..

The Lost Prime Minister ही सीरिज पूर्णपणे नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे जीवन आणि मृत्यू, अन् त्यानंतर घडलेल्या सत्य घटनांवर आधारित आहे.
The Lost Prime minister series ,all about Netaji Subhashchandra Bose
The Lost Prime minister series ,all about Netaji Subhashchandra BoseGoogle
Updated on

The Lost Prime Minister: 'द लॉस्ट प्राइम मिनिस्टर' ही सीरिज नुकतीच लॉन्च केली गेली, ज्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा इतिहास एकदम सविस्तर दाखवण्यात आला आहे.

मुंबई मध्ये आयोजित एका भव्य कार्यक्रमात 'द लॉस्ट प्राइम मिनिस्टर' हा सिनेमा मनोरंजन इंडस्ट्रीतील बड्या कलाकारांच्या उपस्थितीत लॉन्च केला गेला.

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या मृत्यूच्या रहस्याची ही कहाणी दिग्दर्शक प्रख्यात पांडे यानं दिग्दर्शित केली आहे. ही सीरिज पूर्णपणे नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे जीवन आणि मृत्यूनंतर घडलेल्या सत्य घटनांवर आधारित आहे.(The Lost Prime minister series ,all about Netaji Subhashchandra Bose)

The Lost Prime minister series ,all about Netaji Subhashchandra Bose
Shahid Kapoor च्या घरात भाड्यानं राहणार कार्तिक आर्यन..एका महिन्याचं भाडं ऐकाल तर फिरतील डोळे..

हा प्रोजक्ट जितका सोपा वाटत होता तितका साधा-सरळ प्रवास ही सीरिज बनताना नक्कीच नव्हता कारण १९४० सोबतच १९७० च्या दशकातला काळही सीरिजमध्ये दाखवायचा होता. त्यामुळे खूप गोष्टींची गरज लागणार होती. त्यामुळे संपूर्ण टीमला त्या गोष्टी जुळवून आणण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली.

प्रख्यात पांड्ये यांच्या म्हणण्यानुसार त्यांचं स्वतःचं असं कोणतं ऑफिस नाही. ही एक मैदानी सीरिज आहे. त्यामुळे लोकेशन,कास्टिंग,लॉजिस्टिक्स सगळं एकत्र करण्यासाठी दिग्दर्शना दरम्यान खूप प्रयत्न केले गेले. या सीरिजमध्ये एकाही सीनला रिपीट केलं गेलेलं नाही.

सीरिजचा दिग्दर्शक आणि लेखक प्रख्यात पांडेचे नेताजी सुभाष चंद्र बोस आवडत्या क्रांतिकारी नेत्यांपैकी एक आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या आझाद हिंद सेनेचं भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठं योगदान आहे हे सर्वसामान्य लोकांना माहित करुन देण्याचं काम करण्यासोबतच भारतीय तरुणांना प्रेरणा देणारा खरा हिरो कोण हे देखील या सीरिजमुळे कळावा असं प्रख्यात पांडेला वाटत होतं आणि म्हणून त्यानं ही सीरिज बनवण्याचा खटाटोप केला.

The Lost Prime minister series ,all about Netaji Subhashchandra Bose
Bigg Boss 16: कोणाच्या हातात दिसणार विनिंग ट्रॉफी?,घरात आलेल्या ज्योतिषानं दिली हिंट..

नेताजी सुभाष चोंद्र बोस यांच्या मृत्यूचं रहस्य सोडवण्यासाठी आतापर्यंत तीन आयोग स्थापन करण्यात आले. सर्वात पहिलं आणि महत्त्वाचे शाह नवाज आयोग,त्यानंतर जीडी खोसला यांच्या अध्यक्षते अंतर्गत खोसला आयोग..दोन्ही आयोग नेताजींचा मृत्यू विमान दुर्घटनेत झाला यावर सहमत होते.

नेताजींचे भाऊ सुरेश बोस 'खोसला आयोगा'चा एक भाग होते पण ते कधी या आयोगांच्या निर्णयावर सहमत नव्हते. म्हटलं जातं की त्यांनी आयोगांच्या निष्कर्षांना चुकीचं म्हटलं होतं. सीरिजचे नाव 'द लॉस्ट प्राइम मिनिस्टर' ठेवलंय कारण ही सीरिज या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करतेय की नेताजींना सरकारमधील केवळ एक भाग न बनता खरंतर आपलं पंतप्रधान व्हायला हवं होतं.

कारण त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे योगदान दिलं ते इतर क्रांतिकारींच्या तुलनेत खूप अधिक होतं. आपल्याला स्वातंत्र्य अहिंसेच्या मार्गानं मिळालं हा जो लोकांचा समज आहे तो बदलायची गरज आहे कारण आझाद हिंद सेनेने कोहिमा आणि इम्फालवर आक्रमण केलं होतं,ज्यानंतर ब्रिटिश सेनेतील भारतीय सैनिकांनी त्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता.

आझाद हिंद सेनेनं कितीतरी आंदोलनं केली. ज्या आंदोलनांना स्वातंत्र्यासाठी महत्त्वाचं मानलं जातं खरंतर त्यांच्या तुलनेत आझाद हिंद सेनेची आंदोलनं अधिक आक्रमक होती.

ही सीरिज एमएक्स प्लेयर,हंगामा प्ले,एअरटेल एक्सट्रीम आणि वीआई मूव्हीज अॅन्ड टीव्ही या प्लॅटफॉर्मवर आपण पाहू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()