Charchaughi Review: ३१ वर्षे होऊनही अजूनही तितक्याच टवटवीत वाटणाऱ्या 'चारचौघी'!

निर्णय कधीही चुकीचे वा बरोबर नसतात. ते नेहमी दृष्टिकोनावर अवलंबून असतात.काही निर्णय काळाच्या पुढे जाऊन घेतले जातात. नाटकात जरी १९९१ चा काळ दाखवला असला तरी २१व्या शतकातील सामाजिक आणि कौटुंबिक समस्यांवर भाष्य करते.
the play chaarchaughi which on the stage after31 years
the play chaarchaughi which on the stage after31 yearssakal
Updated on

- आरती भुजबळ

Charchaughi Natak :प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ' चारचौघी ' नाटक पुन्हा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे नाटक ३१ वर्षांनी नविन पात्रांसह रंगभूमीवर साकारले जात आहे. नाटक पुरूषप्रधान सत्तेवर भाष्य करणारे असले तरी या चारचौघींना पाठिंबा देणारे दोन पुरूषही दाखवले आहेत.

निर्णय कधीही चुकीचे वा बरोबर नसतात. ते नेहमी दृष्टिकोनावर अवलंबून असतात.काही निर्णय काळाच्या पुढे जाऊन घेतले जातात. नाटकात जरी १९९१ चा काळ दाखवला असला तरी २१व्या शतकातील सामाजिक आणि कौटुंबिक समस्यांवर भाष्य करते.

the play chaarchaughi which on the stage after31 years
Drama Competition : राज्य नाट्य स्पर्धेत पुण्यातून ‘लगीन’ची बाजी; ‘द सिक्रेट ऑफ लाईफ’ द्वितीय

या नाटकात रोहिणी हट्टगंडी , मुक्ता बर्वे , कादंबरी कदम , पर्ण पेठे यांनी मुख्य भुमिका साकारल्या आहेत. रोहिणी हट्टगंडी यांनी आईची भुमिका साकारली आहे. अशी आई जी स्वत: च्या निर्णयावर ठाम राहून कर्ती महिला बनून आपल्या कुटुंबाला सांभाळते.

आईच्या स्वतंत्र विचारसरणीचा तिच्या मुलींवर प्रभाव पडलेला दिसतो. पात्र आईचे असले तरी आपल्या मुलींना मैत्रिंणीसारखे मार्गदर्शन करते. रोहिणी हट्टगंडी यांचा अभिनय प्रभावी आहे

मुक्ता बर्वेने विद्या ही भुमिका साकारली आहे. विद्या ही घरातील मोठी मुलगी असून उच्चशिक्षित आहे. नवऱ्याचे अफेअर समज्यानंतर तिच्या आयुष्यात येणाऱ्या संघर्षाला ती कशी सामोरे जाते हे बघण्यासारखे आहे.

मुक्ता बर्वेचा टेलिफोनवरील संवाद काळजाला भिडणारा आहे. हे पात्र आपल्याला शिकवून जाते की काही गोष्टींसाठी आपण खूप हळवे असतो. पण काही परिस्थितीमध्ये आपल्याला तटस्थ राहावे लागते. मुक्ता बर्वेने ही भूमिका चोखपणे निभावली आहे.

कादंबरी कदमने वैजू हे पात्र साकारले असून तिने तिच्या पात्राला योग्य न्याय दिला आहे. नोकरी करताना अन् वैवाहिक जीवन सांभाळताना तिची होणारी तारेवरची कसर प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे. आर्थिक पाठबळ नसताना पती तिच्याकडून बाळाची अपेक्षा करतो. तिला वंशाचा दिवा हा प्रश्न सातत्याने भेडसावतो.

the play chaarchaughi which on the stage after31 years
Marathi Natak: पुन्हा रंगभूमीवर धुडगूस घालणार मोहन जोशी आणि सविता मालपेकर! पुरुषोत्तम बेर्डे करणार..

पर्ण पेठेने विनीता हे पात्र साकारले आहे. आई आणि बहिणींच्या आयुष्यातील अडचणींचा विनीतावर मानसिक परिणाम होतो. स्वत: च्या जीवनात निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होते.

तिने घेतलेला निर्णय स्विकारायला समाजाला ५० वर्षे तरी लागतील. तिचा निर्णय आधुनिक जगाशी सांगड घालणारा आहे का हे दिग्दर्शकानं प्रभावीपणे मांडले आहे.

the play chaarchaughi which on the stage after31 years
Marathi Natak: मोहन जोशी आणि सविता मालपेकर ही धम्माल जोडी पुन्हा एकदा रंगभूमीवर..

निनाद लिमये , पार्थ केतकर , श्रेयस राजे यांनी ही या चारचौघींना योग्य साथ दिली आहे. संगीत दिग्दर्शन अशोक पत्की यांनी केले असुन नेपथ्य संदेश बेंद्रे यांनी केले आहे.

१५ ऑगस्ट १९९१ रोजी आलेले हे बंडखोर नाटक २१व्या शतकात खूप काही सांगून जाते. चौघीजणांचा वेगवेगळ्या संघर्षानं भरलेला प्रवास हा प्रेक्षकांना वेगळं सुचवून जातो. त्याचबरोबर विचार करण्यास भाग पाडतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.