The Railway Men Trailer: ना आपण जीवे मारणाऱ्यांना शिक्षा देतो ना जीव वाचवणाऱ्यांना शाबासकी! 'द रेल्वे मॅन' कधी आणि कुठे पहाल?

The Railway Men Trailer
The Railway Men TrailerEsakal
Updated on

The Railway Men Trailer: गेल्या काही काळापासून आर माधवन त्याच्या आगामी वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या वेब सिरिजचं नाव आहे 'द रेल्वे मेन'. काही दिवसांपुर्वी या सिरिजचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता जो पाहिल्यानंतर सर्वांना या सिरिजच्या ट्रेलरची उत्सुकता लागली होती.

The Railway Men Trailer
Sara Ali Khan: शुभमन गिलला डेट करतेय विचारताच सारा खान हसली अन् म्हणाली, "सारा का सारा दुनिया...."

'द रेल्वे मेन' ही सिरिज 2 डिसेंबर 1984 साली झालेल्या भोपाळ दुर्घटनेवर आधारित आहे. या दिवशी भोपाळमधील रासायनिक कारखान्यातून विषारी वायूची गळती झाली होती, ज्यामुळे हजारो लोकांनी आपला जीव गमवला होता. याच सत्य घटनेवर वेब सिरीज तयार करण्यात आली आहे.

आज 'द रेल्वे मेन' चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरमध्ये 1984 च्या दुर्घटनेपूर्वीचं भोपाळ सुरुवातीला दिसतं. यात सामान्य लोक गॅस दुर्घटनेपूर्वी लोक कसे आनंदी होते हे दाखवलं जातं. त्यानंतर युनियन गॅस कार्बाइडच्या कारखान्यात गॅस गळती झाल्याची माहीती मिळाल्यानंतर सर्वत्र गोंधळ उडाल्याचं दिसतं.

The Railway Men Trailer
Meghna Naidu: विक्रम गोखलेंनी सांगितलेली कोणती गोष्ट लक्षात राहिली? मेघना नायडूने सांगितला अनुभव

बाबिल खान या चित्रपटात नव्यानेच रुजु झालेल्या रेल्वे कामगाराच्या भूमिकेत दिसतो. केके मेनन रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तर दिव्येंदू हा रेल्वे पोलिस अधिकारी दाखवला आहे. हे तिघेही जीवाचं रान करुन लोकांना वाचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

तर वरिष्ठ रेल्वे अधिकारी म्हणून आर माधवन हा या सर्वांच्या जगण्याची शेवटची आशा असल्याचे दाखवले आहेत. या मालिकेत हे चौघेजण रेल्वेच्या मुख्य यंत्रणेविरुद्ध लढून या भीषण परिस्थितीत लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करताना दाखवण्यात आले आहे.

हा ट्रेलर पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. यशराज फिल्म्सची ही पहिली वेब सिरीज आहे. ज्या माध्यमातुन आर माधवन ओटीटी क्षेत्रात पदार्पण करणार आहे. 'द रेल्वे मेन' 18 नोव्हेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रीमियर होणार आहे.

The Railway Men Trailer
Virat Kohli Video: बायकोचं गाणं वाजताच विराट झाला झिंगाट! भर स्टेडियमध्ये चक्क...

या मालिकेत आर माधवन, केके मेनन, दिव्येंदू शर्मा आणि बाबिल खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दिग्दर्शक राहुल रवैल यांचा मुलगा शिव रवैल 'द रेल्वे मेन'मधून दिग्दर्शन करिअरला सुरुवात करत आहे. आता प्रेक्षकांना या सिरिजची उत्सुकता आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()