Priyadarshini Indalkar: या व्यक्तीने दिलाय बिवाली अवली कोहली हा आवाज..! प्रियदर्शनीने उलगडलं मोठं रहस्य

प्रियदर्शनी महाराष्ट्राची हास्यजत्रा शो मुळे फेमस झालीय
maharashtrachi hasyajatra, priyadarshini indalkar, phulrani, priyadarshini indalkarnews
maharashtrachi hasyajatra, priyadarshini indalkar, phulrani, priyadarshini indalkarnewsSAKAL
Updated on

Priyadarshini Indalkar News: प्रियदर्शनी इंदलकर हिची प्रमुख भूमिका असलेला फुलराणी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. प्रियदर्शनी महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) शो मुळे फेमस झालीय.

हास्यजत्रेत प्रियदर्शनी प्रसाद खांडेकर, शिवाली परब आणि नम्रता संभेराव सोबत बिवाली अवली कोहली हि कॉमेडी भूमिका साकारत आहे.

या चौघांच्या या तुफान कॉमेडी स्किटची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात.

(the secret behind voice of phulrani fame priyadarshini indalkar bivali avali kohli in maharashtrachi hasyajatra)

maharashtrachi hasyajatra, priyadarshini indalkar, phulrani, priyadarshini indalkarnews
Ravi Kishan: त्याने मला कॉफी प्यायला बोलावलं आणि... रवी किशनचा कास्टिंग काऊचचा धक्कदायक अनुभव

मराठी किडा या यु ट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत प्रियदर्शनीने खुलासा केला. ती म्हणाली, "बिवाली अवली कोहली हि भूमिका खूप प्रसिद्ध झाली. हा आवाज आणि हे सुचलं कसं याचं सगळं श्रेय गोस्वामी सरांना जातं.

मी लो टोनमध्ये बिवाली अवली कोहली म्हणाले. हलका लावला होता आवाज. नंतर सचिन गोस्वामी सरांनी मला आवाज काढून दाखवला. अशाप्रकारे बिवाली अवली कोहली हा आवाज मला सरांमुळे मिळाला."

maharashtrachi hasyajatra, priyadarshini indalkar, phulrani, priyadarshini indalkarnews
Sankarshan Karhade: रंगभूमीची पूजा आणि पाठीवर प्रशांत दामलेंची शाबासकी.. संकर्षणचा भारावून टाकणारा अनुभव

पु. ल. देशपांडे लिखित 'ती फुलराणी' हे नाटक मराठी रंगभूमीवर प्रचंड गाजलं. याच नाटकावर आधारित 'फुलराणी' सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात झालाय. गेल्या अनेक महिन्यांपासून फुलराणी सिनेमाची चर्चा होती.

अखेर हा सिनेमा काहीच दिवसांपूर्वी थिएटरमध्ये प्रदर्शित झालाय. फुलराणी सिनेमा परदेशात सुद्धा रिलीज होणार आहे.

फक्त एका दिवसात सॅन फ्रान्सिस्कोच्या बे एरियातील 'फुलराणी' चा पहिलाच शो हाऊसफुल झालाय!! येत्या आठवड्यापासून न्यू जर्सी, बॉस्टन आणि शिकागोतही बुकिंग ओपन होतंय..

अशाप्रकारे फुलराणी सिनेमाचा परदेशातला शो हाउसफुल्ल झालाय. मराठी प्रेक्षकांसाठी निश्चितच हि अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे.

परदेशात फुलराणी फुलली आता महाराष्ट्रात फुलराणीला कसा प्रतिसाद मिळतोय याची सर्वांना उत्सुकता आहे.

'ती फुलराणी' हे मूळ नाटक पु.ल.देशपांडे यांनी जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पिग्मॅलियन या नाटकाचे केलेले मराठी रूपांतरण आहे.

या नाटकात भक्ती बर्वे यांनी मंजुळाची भूमिका साकारली. भक्ती बर्वेनंतर प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी, अमृता सुभाष, हेमांगी कवी यांनी मंजुळाची भूमिका साकारली. आता सिनेमाच्या माध्यमातून प्रियदर्शनी इंदलकर मंजुळाची भूमिका साकारणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.