Tunisha Sharma: “तुनिषाची आत्महत्या, भीतीचे वातावरण अन्…”, सपनाने सांगितला सेटवरील अनुभव

तुनिषाचा मृत्यू आणि मुख्य अभिनेता शीझान खान पोलिस कोठडीत गेल्यानंतर शोमध्ये शांतता होती. मात्र, आता या घटनेनंतर दोन आठवड्यांनंतर 'अली बाबा : दास्तान-ए-काबुल'चे शूटिंग पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
Tunisha Sharma
Tunisha SharmaSakal
Updated on

वर्ष 2022 ने टीव्ही इंडस्ट्रीला एक असे दु:ख दिले, जे त्यांच्या हृदयातून आणि मनातून कोणीही काढू शकत नाही. 24 नोव्हेंबर रोजी, 20 वर्षीय हसत-खेळणारी अभिनेत्री तुनिषा शर्माने तिच्या 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' शोच्या सेटवर मृत्यूला कवटाळले. अभिनेत्रीने शोच्या मेकअप रूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली, ज्यातून कोणीही सावरले नाही. संपूर्ण इंडस्ट्री या दुःखातून सावरण्यात अपयशी ठरत असताना, शोमध्ये काम करणा-या लोकांना असे करणे अत्यंत कठीण जात आहे.

तुनिषाचा मृत्यू आणि मुख्य अभिनेता शीझान खान पोलिस कोठडीत गेल्यानंतर शोमध्ये शांतता होती. मात्र, आता या घटनेनंतर दोन आठवड्यांनंतर 'अली बाबा : दास्तान-ए-काबुल'चे शूटिंग पुन्हा सुरू करण्यात आले आहे. अशी माहिती अभिनेत्री सपना ठाकूर हिने दिली आहे.

अली बाबा: दास्तान-ए-काबुलच्या सेटवर भीतीचे वातावरण आहे. शोची मुख्य अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने सेटवर आत्महत्या केली, तर त्याचा मुख्य अभिनेता शीझान खान त्याच दिवसापासून पोलिसांच्या ताब्यात आहे. अशा परिस्थितीत, दोन्ही प्रमुख कलाकारांच्या जाण्याने शोचे नुकसान झाले आहे. सध्या शोचे जुने एपिसोड्स ऑन एअर केले जात असले तरी आता ते सर्व प्रसारित केले गेले आहेत.

अशा स्थितीत त्याचे शूटिंग आता गेल्या आठवड्यात म्हणजेच 29 डिसेंबरपासून सुरू झाले आहे. या शोची दुसरी अभिनेत्री सपना ठाकूर हिने एका मीडिया संस्थेला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. यासोबतच शोच्या सेटवर सध्या कसे वातावरण आहे हेही सपनाने सांगितले.

Tunisha Sharma
Shiv Tahakare: शिव ठाकरेवर आरोप करणं विकासच्या बायकोला पडेल महागात..

'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' अभिनेत्री सपना ठाकूरने या मुलाखतीत शूटिंग आणि सेटवर परतल्यानंतर तिला कसे वाटले हे सांगितले आहे. तुनिषा आणि शीझान खानची मैत्रीण सपना ठाकूरने या खास संवादात सांगितले की, "अजूनही आम्ही त्या धक्कातून सावरलो नाही आहोत. त्यामुळे सेटवर शूटिंगसाठी जाणे फार कठीण होत आहे. त्यावेळी मी ज्या मन:स्थितीत होते ते शब्दात वर्णन करणे फार कठीण आहे.

आपला मुद्दा पुढे करत सपनाने यावेळी सेटवरील वातावरणाबद्दल बोलले. ती म्हणते, 'संपूर्ण टीम अजून या धक्क्यातून बाहेर आलेली नाही. शूटिंगसाठी सेटवर परत जाणे सध्या खूप कठीण वाटते. हा शो चालू राहिला पाहिजे असे म्हणणे खूप सोपे आहे, पण जेव्हा तुम्ही त्याचा सामना करून पुढे जाता तेव्हा लक्षात येते की ते किती कठीण आहे.

यासोबतच सपनाने हे देखील सांगितले की, जेव्हा तिला शोच्या सेटवरून पुन्हा शूटिंग सुरू करण्याचा कॉल आला तेव्हा तिला कसे वाटले. अभिनेत्री म्हणाली की, जेव्हा तिला पहिल्यांदा शोच्या शूटिंगवर परतण्याचा फोन आला तेव्हा माझ्या मनात पहिला प्रश्न आला की, आपण पुन्हा त्याच सेटवर शूटिंग करणार आहोत का? पण जेव्हा तिला समजले की टीम दुसर्‍या सेटवर शूटिंग करत आहे, तेव्हा तीला खूप शांती मिळली. सपना म्हणते, 'मला त्या सेटवर जायचे नव्हते म्हणून मी विचारले. तिथे आमच्या अनेक आठवणी आहेत. आम्ही त्या सेटवर शूटिंग करत नसल्यामुळे मी शूटसाठी गेले. मला माहित नाही की मला पुढच्या शूटसाठी कधी बोलावले जाईल कारण तुनिषाच्या धक्कादायक मृत्यूनंतर बरेच बदल आणि नियोजन चालू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.