cm uddhav thackeray : गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. अखेर या राजकीय नाट्यावर काल पडदा पडला. गेल्या अडीच वर्षांपासून राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकार अखेर कोसळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (ता.२९) फेसबुक लाईव्हवरुन जनतेशी संवाद साधून राजीनाम्याची घोषणा केली. या राजीनाम्यानंतर मनोरंजन विश्वातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. पण काही कलाकार असे आहेत ज्यांनी गेल्या अडीच वर्षात सरकारला चांगलेच धारेवर धरले. विविध कारणामुळे त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. आज महाविकास आघाडी सरकार कोसळल्याने त्या कलाकारांच्या वक्तव्ये पुन्हा चर्चेत आली आहेत. (these filmstars brought the uddhav thackeray government in trouble more than the opposition leaders)
यामध्ये सर्वात आघाडीवर कंगना रणौत दिसते. कंगनाचा केंद्रा सरकारला आणि पर्यायाने भारतीय जनता पार्टीला उघड पाठिंबा आहे. ती बऱ्याचदा केंद्र सरकारचं कौतुक करत असते तर काँग्रेसला धारेवर धरते. महाविकास आघाडीवरही तिचा विशेष राग आहे. त्याचे कारणही तसेच खास आहे. २०२० मध्ये मुंबई महानगर पालिकेने अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्याचे ठरवले., त्यामध्ये कंगनाचे मुंबई येथील ऑफिसचा काही भागही पाडण्यात आला. यावेळी कंगनाने शिवसेनेवर सडकून टीका केली. 'उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटतं.. तुम्ही माझं घर तोडून माझ्यावर सूड घ्याल. पण एक लक्षात ठेवा आज माझं घर तुटलं आहे, उद्या तुमचं गर्वहरण होईल. हे काळाचं चक्र आहे, ते नेहमी एकसारखं राहत नाही हे लक्षात ठेवा.' असं ती म्हणाली होती. तेव्हापासून तिने ठाकरे सरकारच्या विरोधात अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत.
महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष असलेल्या काँग्रेस वर मध्यंतरी विक्रम गोखले यांनी टीका केली होती. त्यालाही कंगनाच कारणीभूत होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळालं असं म्हणतं कंगनाने काँग्रेस सरकारवर निशाणा साधला होता. या विधानाला विक्रम गोखले यांनी पुस्ती जोडली. कंगना योग्यच बोलली असं म्हणत त्यांनीही वादात उडी घेतली होती.त्यावेळी त्याने भाजप सरकारला उघड पाठिंबा दर्शवला होता.
काश्मीर फाईल्स या चित्रपटानेन बॉक्स ऑफिस वर जोरदार कमाई केली. परंतु महाराष्ट्रात या चित्रपटावरील कर रद्द करवा अशी मागणी भाजप नेत्यांकडून करण्यात आली परंतु महाविकास आघाडीने त्याला समर्थन दर्शवले नाही. तेव्हापासूनच विवेक अग्नीहोत्री हे राज्य सरकारवर नाराज असल्याचे दिसले. त्यांनतर विविध माध्यमातून त्यांनी सेनेवर टीका केली, तर कधी 'दहशत वाद्यांना पाठिंबा देणारे लोक' असे ट्विट करून महाविकास आघाडीवर निशाणा साधला. अगदी एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यांनतर हि त्यांनी एक ट्विट केले होते. ज्यामध्ये त्यांनी 'वडिलांच्या विचारधारेला छेद देणारा मुलगा कधीही यशस्वी होत नाही' असे म्हंटले होते.
मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिनेही महाविकास आघाडीला चांगलेच जेरीस आणले होते. क्रांतीचे पती समीर वानखेडे एन एनसीबीचे उच्च अधिकारी आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्या जावयावर ड्रग्स प्रकरणात अटक केली होती. त्यावेळी माझा जावई निर्दोष असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला. पुढे नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातील संघर्ष वाढला, अगदी तो कौटुंबिक पातळीवर आला. समीर वानखेडे मुसलमान आहेत, असही आरोप करण्यात आला होता. यावेळी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने राष्ट्रवादी काँग्रेस सह महाविकास आघाडी वर सडकून टीका केली. तसेच भाजपने क्रांतीला मोठा पाठिंबा दिला होता. क्रांतीने त्यावेळी राज्यपालांची हि भेट घेतली होती. 'मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावरील आरोप थांबवावेत. आम्ही सत्याच्या बाजूने असून शेवटपर्यंत लढू' असे ती म्हणाली होती.
अभिनेता आरोह वेलणकर हा कायमच भाजपला पाठिंबा देत आलेला आहे. त्याने अडीच वर्षात महाविकास आघाडीवर भरपूर टीका केली. तो त्याच्या ट्विटर अकाउंट वरून आपले विचार मांडत असतो. आजवर त्याने अनेक विषयांवर महाविकास आघाडीलाधारेवर धरले आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच त्याने 'महाविकास आघाडीची वेळ संपत आलीय' अशी टीका त्याने केली होती. सोशल मीडियावर महाविकास आघाडी विरोधात पोस्ट लिहिण्यासाठी तो विशेष ओळखला जातो.
केतकी चितळे हे सध्याचे सर्वात गाजलेले प्रकरण. काही दिवसापूर्वीच केतकीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त कविता शेअर केली होती. यामध्ये तिने शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीला जाऊन टीका केली होती. 'तुका म्हणजे पवारा... नको उडवू तोंडाचा फवारा 'अशा काही ओळी त्यात होत्या. केतकीला याबदल्यात मोठीं किंमत मोजावी लागली. राज्यभरात विविध ठिकाणी तिच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. न्यायालयीन खटला सुरु झाला. तिची सुटका लवकर होत नाही म्हंटल्यावर भाजप देखील या प्रकरणात आक्रमक झाले. केतकीच्या समर्थकांनी यावेळी महाविकास आघाडीला बरेच अडचणीत आणले.
मराठी अभिनेते शरद पोंक्षे सावरकरांच्या विचारांचे निष्ठावंत सेवक आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते भाजपला पाठिंबा देताना दिसत आहेत. भाजपने शिंदे यांच्या बंडाला पाठिंबा दिल्यानंतर शरद पोंक्षे यांनी एक पोस्ट लिहिली. ज्यामध्ये पोंक्षे यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाला नकळत पाठिंबा दर्शवला. शरद म्हणतात, 'कॅन्सरच्या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले एकनाथ शिंदे साहेब, त्यांचा आणि माझा एक फोटोही छापलाय यात ! त्यांनी केलेल्या मदतीबद्दल यात सविस्तर लिहिलंय,' त्यांनी स्वतःच्या दुसरं वादळ या पुस्तकाचा संदर्भ दिला आहे. यावेळी पोंक्षे यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मदतीचा उल्लेख टाळला त्यामुळे तो त्यांनी जाणीवपूर्वक टाळला असा आरोप पोंक्षे यांच्यावर झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.