Thipakyanchi Rangoli: काय पो छे! ठिपक्यांची रांगोळी मालिकेच्या सेटवर रंगली पतंगबाजी

आज मकरसंक्रांत निमिताने कानिटकर कुटूंब सणाचा पूर्ण आनंद घेणार आहेत.
Thipakyanchi Rangoli: काय पो छे! ठिपक्यांची रांगोळी मालिकेच्या सेटवर रंगली पतंगबाजी
Thipakyanchi Rangoli: काय पो छे! ठिपक्यांची रांगोळी मालिकेच्या सेटवर रंगली पतंगबाजीSAKAL
Updated on

स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. मालिकेतील प्रत्येक पात्र लोकप्रिय झालं असून कानेटकर आणि वर्तक कुटुंब प्रेक्षकांच्या कुटुंबाचा एक भाग झालंय. कानिटकर कुटुंबासाठी घरात घडणारी प्रत्येक छोटी मोठी गोष्ट म्हणजे एखादा सण समारंभ.

Thipakyanchi Rangoli: काय पो छे! ठिपक्यांची रांगोळी मालिकेच्या सेटवर रंगली पतंगबाजी
Rakhi Sawant: असा कसा रे तु आदिल! रडून रडून राखीची अवस्था वाईट

आज मकरसंक्रांत निमिताने कानिटकर कुटूंब सणाचा पूर्ण आनंद घेणार आहेत. कानिटकर कुटुंबातील सुमी म्हणजेच अभिनेत्री नम्रता प्रधान हिने मालिकेतील सेटवरचे फोटो शेयर केले आहेत. या फोटोत संपूर्ण कानिटकर परिवार एकत्र आला असून पतंगबाजी करताना दिसत आहेत.

मालिकेतील शशांक, अपूर्वा, कुक्की आणि मानसी असा सर्व परिवार एकत्र आला असून मालिकेत प्रेक्षकांना खास पतंगबाजी दिसणार आहे. मालिकेतील महिला कलाकारांनी काळ्या रंगाच्या साड्या तर पुरुषांनी काळा कुर्ता परिधान केला आहे. ठिपक्यांची रांगोळी मालिकेत ऑफ स्क्रीन आणि ऑन स्क्रीन कलाकार किती धम्माल करतात हेच यावरून पाहायला मिळतं.

Thipakyanchi Rangoli: काय पो छे! ठिपक्यांची रांगोळी मालिकेच्या सेटवर रंगली पतंगबाजी
Urfi Javed: उर्फी काही नमेना! पोलिस स्टेशनमधून आल्यावर नवीन फॅशनचा अविष्कार

ठिपक्यांची रांगोळी मालिका सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता स्टार प्रवाहवर सुरु आहे. मालिकेत चेतन वडनेरे, ज्ञानदा रामतीर्थकर, नम्रता प्रधान, अतुल तोडणकर, मंगेश कदम, लीना भागवत, सुप्रिया पाठारे अशा दिग्गज कलाकारांची फौज आहे. सुरुवातीपासून हि मालिका चांगला TRP मिळवत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. स्टार प्रवाह वरील एक महत्वाची मालिका म्हणून या मालिकेची ओळख आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()