'द कपिल शर्मा शो'(The Kapil Sharma Show) बंद होणार या बातमीनं चाहत्यांमध्ये भलतीच नाराजी पसरली आहे. वीकेंडला लोकांना पोट धरुन हसायला लावणाऱ्या या फेव्हरेट शो ला सगळेच मिस करणार आहेत हे मात्र नक्की. सोशल मीडियावर तर ही बातमी भलतीच चर्चेत आहे. अर्थात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली गेली नाही. या बातमीच्या निराशेच्या गर्तेतून लोकं बाहेर येत नाही तोवर आणखी एका बातमीनं डोकं वर काढलं आहे. एक व्हिडीओ इंटरनेटवर जोरदार चर्चेत आहे. या व्हिडीओत 'द कपिल शर्मा शो' मधील एक प्रसिद्ध नट रस्त्याच्या कडेला चहा विकताना दिसत आहे.
विनोदी अभिनेता सुनील ग्रोव्हर(Sunil Grover) सोशल मीडियावर भलताच पॉप्युलर आहे. तो नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करीत असतो. नुकताच त्याचा एक व्हिडीओ चर्चेत आला होता,ज्याला पाहून प्रत्येकजण हैराण झालेला दिसून आला. सुनील ग्रोव्हरला रस्त्याच्या कडेला चहा बनवताना पाहून त्याचे चाहते थोडे निराश झालेले दिसून येत आहेत. तो व्हिडीओ आम्ही बातमीत जोडलेला आहे.
सुनील ग्रोव्हरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तो गढवालमध्ये एका टी स्टॉलवर चहा बनवताना दिसत आहे. रस्त्याच्या कडेला टपरीवर उभा राहिलेला सुनील खुप आवडीनं चहा बनवताना दिसत आहे. तर दुकानाची मुळ मालकीण त्याच्याकडे मोठ्या प्रेमाने पाहतेय. सुनिलच्या या व्हिडीओवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पहायला मिळाल्या आहेत. सुनीलची चहा बनवण्याची पद्धत चाहत्यांच्या भलतीच पसंतीस उतरली आहे. या व्हिडीओला अनेकजण पसंत करताना दिसत आहेत.
एका नेटकऱ्यानं या व्हिडीओवर प्रतिक्रिया नोंदवताना लिहिलं आहे,'तुम्ही याचसाठी माझे फेव्हरेट अॅक्टर आहात'. अनेक लोकांना सुनीलचा व्हिडीओतला साधेपणा खूप आवडला आहे. आणखी एका चाहत्यानं लिहिलं आहे,' मी तुमच्याइतका कोणाचाच फॅन नाही'. तर आणखी एकानं लिहिलं आहे,'मी तुमच्या कॉमेडीला खूप मिस करतो'. सुनील ग्रोव्हरची काही दिवसांआधी बायपास सर्जरी झाली आहे. आता तो बरा झाला आहे आणि त्यानं पुन्हा कामाला सुरुवात केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.