'आदिपुरुष' चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. त्याच्या पोस्टरलाही चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अनेक मराठी अभिनेते झळकणार आहेत. रुपेश जाधव हा त्यापैकी एक.... इ-सकाळनं त्याच्याशी संवाद साधून त्याला आदिपुरुषविषयी बोलतं केलंय....यावेळी त्यानं आपल्या या चित्रपटाविषयीच्या वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिला आहे. रुपेशनं आदिपुरुषच्या निमित्तानं वेगवेगळे किस्से सांगत त्याच्या या चित्रपटाच्या काही आठवणीही सांगितल्या.
3D अॅक्शन ड्रामा प्रकारात मोडणारा हा चित्रपट असून याची निर्मिती भूषण कुमार यांनी केली आहे. आदिपुरुषचं चित्रिकरण मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये झालंय. या चित्रपटाचं प्री-प्रॉडक्शन तब्बल ४ वर्षे चाललं. यातील तांत्रिक बाबींसाठी टीमने खूप मेहनत घेतली आहे, ज्याचा अनुभव आपल्याला पडद्यावर पहायला मिळेल. चित्रपटात प्रभास आणि क्रिती सॅनन हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यासोबतच चित्रपटात काही मराठमोळे चेहरेही झळकणार आहेत. त्यातीलच एक म्हणजे अभिनेता रुपेश जाधव. 'आदिपुरुष'मध्ये रुपेश हा महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. नुकतंच या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं.
'इ सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत रुपेशने त्याच्या शूटिंगचा अनुभव शेअर केला. सन २०२०मध्ये रुपेशने या चित्रपटासाठी पाच ते सहा टप्प्यात ऑडिशन दिली. सेटवरील एकंदर वातावरण आणि इतर कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता, याविषयी तो दिलखुलासपणे बोलला.
ओम राऊत, प्रभाससोबत काम करण्याचा चांगला अनुभव
"प्रभाससोबतचा अनुभव खूपच छान होता. अगदी कमी दिवसांमध्ये सेटवर आमच्यात मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण झालं, एवढा मोठा अभिनेता आणि प्रसिद्धी मिळूनही प्रभास यांचा स्वभाव विनम्र आहे. मी बॉलिवूडमध्ये ओम राऊत यांच्या चित्रपटातून पदार्पण करत आहे, याचा मला खूप आनंद होतोय. ओम सर त्यांच्या कामाच्या बाबतीत एकदम सतर्क असतात. कलाकारांना ते आपल्या पद्धतीनं काम करण्याला वाव देतात, त्यामुळं त्यांच्यासोबत काम करुन अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या, सगळ्या कलाकारांबरोबरचा अनुभव खूपच छान होता" असं रुपेशनं सांगितलं.
मराठी चित्रपटसृष्टी ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास
रुपेशचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट असून 'आदिपुरुष'मध्ये तो साहसदृश्ये करतानाही दिसणार आहे. त्याच्या अभिनयाची सुरुवात पुण्याच्या दिशा चित्रा, पुणे या नाटकाच्या ग्रुपमधून झाली. नंतर त्यानं अनेक एकपात्री नाटकं, एकांकिका, दिर्घांक, दोन अंकी आणि तीन अंकी मराठी आणि हिंदी नाटकात कामं केली. यासाठी त्याला अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत. रुपेशने 'यशवंतराव चव्हाण : बखर एका वादळाची' आणि 'रझाकार' या मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.