72 Hoorain सिनेमाच्या रिलीजआधीच झालंय या पाकिस्तानी कलाकाराचे निधन, सर्वांना शोक

केरळ स्टोरी नंतर वादग्रस्त विषयावर आधारीत ७२ हुरे हा सिनेमा पाहायला प्रेक्षक आतुर आहेत
This Pakistani actor rashid naaz passed away before the release of 72 Hoorain
This Pakistani actor rashid naaz passed away before the release of 72 HoorainSAKAL
Updated on

72 Hoorain News Rashid Naaz: सध्या सगळीकडे ७२ हुरे सिनेमाची चर्चा आहे. द केरळ स्टोरी नंतर वादग्रस्त विषयावर आधारीत ७२ हुरे हा सिनेमा पाहायला प्रेक्षक आतुर आहेत. अशातच या सिनेमाविषयी एक मोठी अपडेट समोर आलीय.

या चित्रपटात एका पाकिस्तानी अभिनेत्यानेही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. अभिनेता रशीद नाज या असं या अभिनेत्याचं नाव आहे.

(This Pakistani actor rashid naaz passed away before the release of 72 Hoorain)

72 हूरें या चित्रपटात राशिद नाजने महत्त्वाची भूमिका साकारली असून त्याची झलक ट्रेलरमध्येही पाहायला मिळाली आहे. पण आता हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत असताना हा चित्रपट पाहण्यासाठी अभिनेता या जगात नाही.

17 जानेवारी 2022 रोजी वयाच्या 73 व्या वर्षी या अभिनेत्याचे निधन झाले. त्यांनी अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केले. ७२ हुरे सिनेमात रशीद नाजने महत्वाची भूमिका साकारलीय.

This Pakistani actor rashid naaz passed away before the release of 72 Hoorain
Nutan Bungalow Collapse: मुसळधार पावसामुळे दिवंगत अभिनेत्री नूतन यांच्या ठाण्यातील बंगल्याचा भाग कोसळला

रशीद नाझबद्दल बोलायचे तर, बॉलिवूडमध्ये त्यांचे संबंध चांगले होते आणि अभिनेता याआधी बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसला आहे. 2015 मध्ये रिलीज झालेल्या अक्षय कुमारच्या बेबी या चित्रपटात तो दिसला होता.

या चित्रपटात त्यांनी मौलाना मोहम्मद अब्दुल रहमान यांची भूमिका साकारली होती. हि खलनायकी भूमिका प्रचंड गाजली. याशिवाय तो काही उर्दू, पश्तो आणि इंग्रजी चित्रपटांमध्येही दिसला आहे.

This Pakistani actor rashid naaz passed away before the release of 72 Hoorain
Ameya Khopkar: तर पाकिस्तानी कलाकारांच्या तंगड्या तोडून हातात देऊ.. अमेय खोपकरांचा इशारा

काय आहे ७२ हुरे सिनेमा

७२ हुरे सिनेमाची कथा सांगायचं झालं तर... ज्यामध्ये दहशतवाद्यांना त्यांच्या प्रशिक्षणादरम्यान आश्वासन दिले जाते की मृत्यूनंतर 72 कुमारी मुली (अप्सरा) जन्नतमध्ये त्यांच्या सेवेत उपस्थित राहतील.

अशा स्थितीत मृत्यूनंतर हे दहशतवादी 72 हुरांसोबत भ्रष्टतेची स्वप्ने पाहू लागतात आणि त्यांच्या लोभामुळे दहशतवादाच्या क्रूर घटना घडवून आणण्यात कसूर करत नाहीत.

मात्र त्यांना हे कधीच कळत नाही की हा केवळ एक भ्रम आहे. सत्यात तस काहीच नसतं. त्याचा केवळ वापर करुन घेतला जातो. हा सिनेमा ७ जुलैला रिलिज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.