Shivaji Satam World Record News: दया कुछ तो गडबड है म्हणणारे शिवाजी साटम CID मालिकेतून लोकप्रिय झाले. शिवाजी साटम यांनी त्यांचे विशिष्ट हावभाव वापरून CID मालिकेतील भूमिका लोकप्रिय केली.
शिवाजी साटम यांनी आजवर अनेक लोकप्रिय सिनेमे, नाटक आणि मालिकांमधून लोकप्रिय भूमिका साकारली.
शिवाजी साटम हे असे कलाकार आहेत ज्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. आज शिवाजी साटम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काय आहे यामागचं कारण. पाहूया
(This world record is named after Shivaji Satam who said Kuch to Gadbad Hai in CID serial)
हेही वाचा: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
CID हा टीव्ही शो शिवाजी साटम यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला. कारण या शोने त्यांचे नाव केवळ घराघरात पोहोचवले नाही, तर त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले.
वास्तविक, 'CID' ही भारतातील सर्वात जास्त वेळ चालणारी टीव्ही मालिका आहे. २१ जानेवारी १९९८ रोजी सुरू झालेला CID मालिकेचा शेवटचा भाग २७ ऑक्टोबर २०२८ रोजी टेलिकास्ट झाला.
२००४ मध्ये CID या शोने सर्वात जास्त वेळ अनकट शूटिंग करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. 'CID'च्या टीमने 111 मिनिटे कोणताही कट न करता सर्वात लांब वन शॉट शूटिंग केलं.
हा भाग शूट केल्यानंतर 'सीआयडी'च्या टीमने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड या दोन्हींमध्ये नाव नोंदवले. शिवाजी साटम यांच्या कारकिर्दीतील ही सर्वात मोठी गोष्ट होती.
शिवाजी साटम आज आपला 73 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. शिवाजी साटम यांचा जन्म २१ एप्रिल १९५० रोजी झाला.
अभिनय क्षेत्रात येण्याआधी त्यांनी बँकेत नोकरी केली. त्यानंतर त्यांच्या अभिनयाची कारकीर्द १९७५ साली ‘रॉबिनहूड’ या मराठी बालनाट्यापासून झाली. 1980 मध्ये रिश्ते-नाते या लोकप्रिय मालिकेतून त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.
1998 मध्ये प्रदर्शित झालेली सीआयडी या मालिकेतील शिवाजी यांच्या ‘दया कुछ तो गडबड है’, दया तोड दो दरवाजा’, हे डायलॉग प्रचंड लोकप्रिय झाले.
2013 साली मालिका सोडून फक्त चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला पण प्रेक्षकांच्या आग्रहामुळे त्यांनी सीआयडीमध्ये पुन्हा काम करण्यास सुरूवात केली.
शिवाजी साटम यांना 'ध्यानी मनी' या मराठी चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र राज्याचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.