Tiger 3 Trailer: आता प्रतीक्षा संपली! या दिवशी टायगर 3 चा ट्रेलर येणार, सलमान खानच्या फॅन्सना उत्सुकता

टायगर 3 चा ट्रेलरची डेट समोर आलीय
tiger 3 trailer on 16 october salman khan katrina kaif emraan hashmi
tiger 3 trailer on 16 october salman khan katrina kaif emraan hashmi SAKAL
Updated on

सलमान खानच्या आगामी टायगर 3 ची सर्वांना उत्सुकता आहे. सलमान खानच्या टायगर 3 सिनेमाची गेल्या काही दिवसापासून उत्सुकता होती.

आता सलमान खानचा टायगर 3 चा ट्रेलर करणार कधी येणार याची सर्वांना उत्सुकता होती. आता टायगर 3 चा ट्रेलर कधी येणार याची तारीख उघड झालीय. जाणून घ्या.

(tiger 3 trailer on 16 october salman khan katrina kaif emraan hashmi)

tiger 3 trailer on 16 october salman khan katrina kaif emraan hashmi
Jawan SRK Fan Meet: कोणी मिठी मारलं, कोणी पाया पडलं, जवान सुपरहिट झाल्याने शाहरुखचं फॅन्सना खास गिफ्ट

आदित्य चोप्रा टायगर 3 चा ट्रेलर लॉंच करण्याची जय्यत तयारी सुरु करतोय. आदित्य चोप्रा 16 ऑक्टोबरला सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर टायगर 3 चा बहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज करणार आहे!

टायगर 3 यावर्षी दिवाळीच्या मोठ्या पडद्यावर रिलीज होत आहे. त्यामुळे टायगर 3 च्या माध्यमातून सलमान खान पुन्हा एकदा बॉक्स ऑफीस सुपरहिट कामगिरी करण्यास सज्ज आहे.

एक था टायगर आणि टायगर जिंदा है च्या प्रचंड यशाने आदित्य चोप्राचा विश्वास दृढ केला की तो कबीर उर्फ हृतिक रोशन आणि पठाण उर्फ शाहरुख खान यांना त्याच्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये सामील करू शकतो.

यशराज फिल्म्सने आज त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याची माहितीची दिली. ते आदित्य चोप्रा YRF स्पाय युनिव्हर्स ची एक एक वीट रचत आहे आणि सलमान खान आणि कतरिना कैफ अभिनीत टायगर 3 हा पुढचा मोठा चित्रपट आहे. टायगर उर्फ सलमान खान हा YRF स्पाय युनिव्हर्सचा OG आहे कारण एक था टायगर (2012) याने भारतीय चित्रपटसृष्टीने यापूर्वी कधीही न पाहिलेले सुपर ऐजेंट तयार करण्यासाठी मूकपणे योजना राबवली!

पठाणमध्येच आदित्य चोप्राने अधिकृतपणे खुलासा केला की ते वायआरएफ स्पाय युनिव्हर्स बनवत आहे आणि फ्रेंचाइजी लोगोचे अनावरण केले. या महत्त्वाकांक्षी गुप्तचर विश्वातील पात्रांच्या क्रॉसओवरची सुरुवात पठाणपासूनही झाली, ज्यामध्ये शाहरुख खान आणि सलमान खान या दोन सिनेमॅटिक आयकॉन्सच्या सुपरस्टारडमचा उत्सव साजरा करणाऱ्या अ‍ॅड्रेनालाईन पंपिंग अॅक्शन सीक्वेन्समध्ये एकत्र आले.

या क्रॉस-ओव्हरने प्रेक्षक आणि चाहत्यांना हे सांगण्याचा YRF चा हेतू देखील दर्शविला की हे सुपर-स्पाय दाखवणारा प्रत्येक चित्रपट एकमेकांशी जोडलेला असेल. टायगर 3 चे दिग्दर्शन मनीश शर्मा यांनी केले आहे. टायगर 3 यावर्षी दिवाळीत रिलीज होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.