मुंबई - देशभरात कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. अशावेळी अनेक राज्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली होती. आता लॉकडाऊनचे नियम ब-यापैकी शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडताना दिसत आहे. बॉलीवूडमध्येही (bollywood) कोरोनाचा (corona) कहर वाढला होता. अनेक सेलिब्रेटींना (celebrities) कोरोनाची लागण झाली होती. त्याचा परिणाम निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यावर झाल्याचे दिसून आले आहे. काही चित्रपटांचे प्रदर्शनही पुढे ढकलण्यात आले आहे. अशातच बॉलीवूडमधील प्रसिध्द जोडी टायगर श्रॉफ (tiger shroff) आणि त्याची मैत्रीण दिशा पटानी (disha patani) हे एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहे. (tiger shroff and disha patani pulled over by mumbai police during long drive)
सध्या राज्यात लॉकडाऊनचे (Lockdown) नियम शिथिल करण्यात आले आहे. याचा फायदा अनेकजण घेताना दिसत आहेत. त्याला बॉलीवूडमधील (bollywood celebrities) सेलिब्रेटींचाही अपवाद नाही. प्रसिध्द अभिनेता टायगर श्रॉफ (tiger) आणि दिशा पटानी (disha) हे दोघेही लाँग ड्राईव्हसाठी निघाले होते. त्यावेळी त्यांना पोलिसांना पकडले. आणि त्यांच्याकडे काही कागदपत्रांची मागणी केली. त्या दोघांच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर जोरदारपणे सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनमुळे घरातच राहावं लागल्यानं सध्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे.
टायगर आणि दिशाच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. ते गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ज्यावेळी ते रात्री उशिरा ड्राईव्हसाठी बाहेर पडले तेव्हा त्यांना एकत्र पाहिले गेले. त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावेळी त्यांना पोलिसांनी लायसन्स आणि आधार कार्डाची विचारपूस करण्यासाठी थांबवले होते.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टायगर आणि दिशा जीमनंतर ड्राईव्हसाठी बाहेर पडले होते. त्यांना बांद्रा येथील बँडस्टॅन्ड जवळ पोलिसांनी अडवले. आणि त्यांच्याकडे लायसन्स मागितले. त्या तपासणीनंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.