Tiger Shroff: अभिनेता टायगर श्रॉफ हा त्याच्या ॲक्शन आणि स्टंटसाठी ओळखला जातो. टायगरने मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण घेतलंय. त्याच्या प्रत्येक सिनेमामध्ये मार्शल आर्ट्स प्रती त्याचं प्रेम दिसून येतच. टायगर त्याच्या प्रत्येक सिनेमात स्वतः स्टंट करणं पसंत करतो. आपलं स्टंट कौशल्य हॉलीवूडमध्येही दाखवण्याची टायगरची इच्छा आहे. तुम्हाला कदाचित माहित नसेल पण टायगरने हॉलीवूड सिनेमासाठी ऑडिशनही दिलं होतं. (Tiger Shroff says he auditioned for Spider-Man, told makers: ‘I’d save you money on VFX)
टायगरने 'स्पायडरमॅन' या ॲक्शन हॉलीवूडपटासाठी ऑडिशन दिलं होतं. या संधीच्या तो बराच जवळही पोहोचला होता. टॉम होलँडच्याएवजी स्पायडरमॅन म्हणून टायगर श्रॉफ झळकू शकला असता. मात्र त्याची ही संधी हुकली. नुकताच या गोष्टीचा खुलासा स्वतः टायगर श्रॉफने एका मुलाखतीमध्ये केला. एवढंच काय तर पहिल्याच ऑडिशन वेळी टायगरने थेट मेकर्सनाच एक ऑफर दिली होती. ही ऑफर ऐकून तुम्ही नक्कीच चकित व्हाल.
कनेक्ट एफएम कॅनडाला दिलेल्या मुलाखतीत टायगरने सांगितलं, "मी 'स्पायडरमॅन'साठी ऑडिशन दिलं होतं, मी माझ्या टेप आणि शो-रील पाठवल्या होत्या. माझं ऑडिशन पाहून ते खूप इम्प्रेसही झाले होते." टायगरने या मुलाखतीत ऑडिशनवेळी त्याने मेकर्सना दिलेल्या एका ऑफरचा मजेशीर किस्सादेखील शेअर केला.
"मी त्यांना म्हणालो की मी तुमचे VFX इफेक्ट वरील बरेच पैसे वाचवू शकतो. कारण स्पायडरमॅन जे करतो ते सगळं काही मी करू शकतो. मी स्वतः सगळे स्टंट करू शकतो. या संधीच्या मी खूपच जवळ पोहोचलो होतो." असा खुलासा टायगर यावेळी केला. जॅकी चॅन, ब्रुसलीप्रमाणे मार्शल आर्ट्सच ग्लोबल स्टार व्हायचं स्वप्न आहे. असं टायगर यावेळेस म्हणाला.
मात्र या ऑडिशनवेळी टायगरला नशिबाने साथ दिली नाही. त्याची निवड होऊ शकली नाही. टॉम हॉलंडला सुपरहिरो पीटर पार्कर म्हणजेच स्पायडरमॅन बनण्याची संधी मिळाली. या भूमिकेमुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. तर 2017 सालामध्ये आलेल्या 'स्पायडरमॅन होम कमिंग' या सिनेमाचं हिंदी डबिंग टायगरने केलं होतं. स्पायडरमॅनचे सर्व डायलॉग त्यांने डब केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.