Timespass 3: 'टाईमपास ३'ची जोरदार कमाई! तरीही निर्मात्यांना भीती,कारण..

Timepass 3 box office collection : 'टाईमपास ३'ने कल्ला केला पण गल्ल्याचं काय.. कमाई पाहून निर्माते चिंतेत..
Timespass 3: 'टाईमपास ३'ची जोरदार कमाई! तरीही निर्मात्यांना भीती,कारण..
sakal
Updated on

Timepass 3 box office collection : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मराठी चित्रपट टाईमपास ३ (Timepass 3) अखेर प्रदर्शित झाला आहे. यातील गाणी आणि संवादाची सोशल मीडियावर चर्चा रंगलेली दिसते. यात मुख्य भूमिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) असून त्यांनी 'पालवी' आणि 'दगडू' ही पात्रं साकारली आहेत. 'दोन नंबर लव्हचा हा एक नंबर लोचा'असं म्हणणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय का हेही पाहणे महत्वाचे आहे. या चित्रपटाने चार दिवसात केलेली कमाई नुकतीच समोर आली आहे. (timepass 3 box office collection)

रवी जाधव (Ravi Jadhav) दिग्दर्शित 'टाईमपास ३' शुक्रवारी २९ जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सध्या जोरदार प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांपासून ते मान्यवरांपर्यंत अनेक चित्रपटांनी याचे कौतुक केले आहे. अभिनेत्री हृता दुर्गुळेचा चित्रपटातील बिनधास्त, काहीसा मवाली अंदाज पासून चाहते भलतेच खुश झाले आहेत. प्रेम, विनोद, संवेदना,भावनिकता आणि मस्तीभरा असा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाने चार दिवसात जवळपास ४.३६ कोटींची कमाई केली आहे. नुकतीच यासंदर्भात एक पोस्ट दिग्दर्शक रवी जाधव यांनी शेअर केली आहे. असे असले तरी एक चिंता निर्मात्यांना लागून राहिली आहे (timepass 3 box office collection hruta durgule prathamesh parab ravi jadhav sanjay narvekar vaibhav mangle)

या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी ८० लाखांची कमाई केली. दुसऱ्या शनिवारी त्यात वाढ होऊन दोन दिवसांची कमाई १ कोटी ९० लाखांची कमाई केली आहे. रविवारी या प्रतिसादात आणखी वाढ झाली आणि सोमवार अखेर एकूण कमाई ४.३६ कोटी रुपये इतकी झाली. ही आनंदाची बातमी रवी जाधव यांनी सोशल मीडियावर दिली. असे असले तरी आगामी काळात इतर चित्रपटांशी असलेली स्पर्धा आणि चित्रपटाचा निर्मिती खर्च याचे गणित पाहून निर्माते चिंतेत आहेत. असं म्हणतात, या चित्रपटाचा एकूण निर्मिती खर्च हा अंदाजे १० कोटी रुपये इतका आहे. त्यामुळे तो भरून काढण्यासाठी या चित्रपटाच्या कमाईत वाढ होणं गरजेचे आहे. त्यामुळे हा चित्रपट हीट ठरला की फ्लॉप हे लवकरच समोर येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.