timepass 3 : 'आई बाबा आणि साई बाबाची शप्पथ’, ‘हम गरीब हुए तो क्या हुआ’ या अनेक हिट संवादाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा चित्रपट म्हणजे ‘टाईमपास’. या चित्रपटाच्या तिसरा भाग काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. 'टाइमपास 3' मध्ये दाखवण्यात आलेल्या दगडू आणि पालवीच्या प्रेमकहाणीने मराठी पडद्यावर वेगळीच रंगत आणली आहे. ह्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवारी जोरदार कमाई केली. आता प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. हा चित्रपट जर कुणाचा पाहायचा पाहुन गेला असेल किंवा कुणाला पुन्हा पाहायचा असेल तर ते आता घरबसल्या या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात. (timepass 3 marathi movie releasing on ott platform zee 5)
'टाइमपास' आणि 'टाइमपास 2' नंतर 'टाइमपास 3' प्रदर्शित झाला. एखाद्या चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शित करणं हे मोठं आव्हान असतं. पण दिग्दर्शक रवी जाधव यांनी ते स्वीकारलं आणि तिसरा भागही हीट करून दाखवला. आजवर या सिरिज मध्ये आपण दगडू आणि पराजू ची लव्हस्टोरी पाहिली होती पण या चित्रपटात दगडू सोबत पालवी पाहायला मिळाली. दोन नंबर लव्हचा हा एक नंबर लोचा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. आज 16 सप्टेंबर रोजी या चित्रपटाचा 'ZEE5' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रीमियर होणार आहे.
झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशनची निर्मिती असलेल्या आणि रवी जाधव (Ravi Jadhav) यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या या चित्रपटात दगडू च्या भूमिकेत आपला लाडका प्रथमेश परब (Prathamesh Parab) आहे तर पालवीची भूमिका तरुणाईच्या 'दिल की धडकन' अशी ओळख असणाऱ्या हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिने साकारली आहे. विशेष म्हणजे आजवर कधीच न बघितलेल्या अवतारात हृता आपल्याला यात दिसणार आहे. काहीशी मवाली, बिनधास्त हृता या चित्रपटात दिसते.
या व्यतिरिक्त चित्रपटात माधव लेले उर्फ शाकाल म्हणजेच वैभव मांगले, (vaibhav mangle) शांताराम परब म्हणजे भाऊ कदम (Bhau kadam), आरती वडगबाळकर, दगडू गॅंग आणि एका जबरदस्त भूमिकेत संजय नार्वेकर आहेत. संजय नार्वेकर (sanjay narvekar) पालवीच्या वडिलांची भूमिका साकारली आहे, जे स्वतः गुंड आहेत. चित्रपटात एकूण पाच गाणी असून ती क्षितीज पटवर्धन यांनी लिहिली आहेत तर संगीत अमितराज यांचं आहे. चित्रपटाची कथा रवी जाधव यांची असून प्रियदर्शन जाधव याने चित्रपटाची पटकथा आणि सवांद लिहिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.