मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव हे त्यांच्या नवनवीन चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. टाईमपास, बालकपालक, टाईमपास-2 या चित्रपटांना रसिकांनी जोरदार प्रतिसाद दिला होता. या चित्रपटांच्या घवघवीत यशानंतर रवी जाधव यांनी काही दिवसांपूर्वी ‘टाईमपास-3’ची घोषणा सोशल मीडियावर केली होती. दगडू आणि प्राजूची लव्हस्टोरी पुन्हा एकदा पाहायला मिळणार असल्ययाने प्रेक्षकांमध्ये या तिसऱ्या भागाबद्दल उस्तुकता निर्माण झाली होती.
‘टाईमपास-3’च्या चित्रिकरणाचे काही भाग बाकी असतानाच चित्रपटाचे निर्माते असलेल्या मौर्य फिल्म्स एंड एंटरटेन्मेंट आणि दिग्दर्शक रवी जाधव यांच्यात वाद निर्माण झाला आहे. निर्मात्यांनी वृत्तपत्रात दिलेल्या नोटिशीनुसार ‘टाईमपास 3’च्या सर्व भागांवर कायदेशीररित्या आपला हक्क असल्याचा दावा ते करत आहेत. ‘टाईमपास 3’ चित्रपटाबद्दल 3 नोव्हेंबर 2020 मध्ये एमओयू झाला होता. त्यानुसार टाईमपास 3 च्या सर्व प्रकारच्या आशयावर मौर्यचा हक्क असल्याचं ते म्हणतात. यात पटकथा, साऊंड ट्रॅक, ब्रँड नेम्स आदी सगळ्यांवर मौर्यचा हक्क असल्याचं ते सांगतात. शिवाय, रवी जाधव यांना ठरल्यानुसार या चित्रपटासाठी पैसे दिल्याचा उल्लेखही या नोटिशीत करण्यात आला आहे.
हेही वाचा : 'अत्यंत हुशार दिग्दर्शक आम्ही गमावला'; सुमित्रा भावेंच्या निधनाने हळहळली चित्रपटसृष्टी
टाईमपास 3 साठी चित्रपटामधील प्रॉपर्टी वापरण्याचा हक्क मौर्यचा यांचा आहे. तो दुसऱ्या व्यक्तीने वापरल्यास रॉयल्टी त्यांना मिळणे क्रमप्राप्त आहे. याचा उल्लेखही या नोटिशीत आहे. निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यातल्या या वादामुळे आता टाईमपास 3 चित्रपट संकटात अडकला आहे. या संपूर्ण वादावर रवी जाधव यांनी अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.