TMKOC: तारक मेहताचे निर्माते असित मोदीचं मोठं वक्तव्य, 'यापुढे...'

टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या तारक मेहता मालिकेनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. दीड दशकांहून अधिक काळ ही विनोदी मालिका प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करताना दिसत आहे
TMKOC news
TMKOC newsesakal
Updated on

TMKOC News: टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या तारक मेहता मालिकेनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. दीड दशकांहून अधिक काळ ही विनोदी मालिका प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करताना दिसत आहे. गेल्या काही (Tv entertainment news) महिन्यांपासून या मालिकेला मोठे धक्के बसताना दिसत आहे. त्याचे कारण या मालिकेतील मोठमोठे कलाकारांनी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासगळ्यात प्रेक्षकांना मोठे नवल वाटत आहे. ज्या मालिकेनं (viral news) त्यांचे मनोरंजन केले, हसवले त्याच मालिकेतील कलाकार त्यांना सोडून जात आहेत. यासगळ्यावर आता मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

तारक मेहताच्या कलाकारांसोबत प्रेक्षकांचे अनोखे नाते आहे. कलाकारांशी एक वेगळ्या प्रकारचे नाते तयार झाले आहे. मात्र प्रेक्षकांना धक्का देण्याचे काम तारक मेहताच्या कलाकारांनी केल्याचे दिसून आले आहे. कलाकार सोडून जात असताना त्यावर निर्माते कोणतीच प्रतिक्रिया का देत नाही असा प्रश्न प्रेक्षकांकडून केला जात होता. यावर आता मालिकेचे निर्माते मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचे झाले असे की, तारक मेहतामध्ये मोठी भूमिका साकारलेल्या शैलेश लोढा यांनी मालिकेतून एक्झिट घेतली होती. त्यावर मेकर्सकडून कोणतीही प्रतिक्रिया न आल्यानं नेटकरी नाराज झाले होते.

TMKOC news
Aamir Khan : 'जेवायला तर बोलावलं पण...' दीपिकानं सांगितला आमिरचा किस्सा!

आता प्रोड्युसर मोदी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं अनेकांना नवल वाटले आहे. निर्मात्यांनी अनेकदा लोढा यांना पुन्हा मालिकेत येण्यासाठी गळ घातली होती. मात्र लोढा हे आपल्या निर्णयावर ठाम होते. यासगळ्यावर मोदी यांची प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणतात, हे पाहा, तारक मेहता हा शो कुणासाठी थांबणारा नाही. त्यातील कलाकार त्यांच्या मर्जीनं बाहेर पडत आहेत. अशावेळी त्यांना पुन्हा मालिकेत येण्यासाठी विनवणी देखील केली जात आहे. मात्र ते त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. अशावेळी मालिका काही कुणासाठी थांबणार नाही. प्रेक्षकांच्या मनोरंजनाची जबाबदारी आमच्यावर आहे. मी तर सगळ्यांना हात जोडून विनंती केली होती. मात्र कुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून आले.

TMKOC news
Laal Singh Chaddha: आमिरच्या लाल सिंग चढ्ढावर तीन राज्यांमध्ये 'बंदी?'

आम्हाला फक्त तारक मेहताचा विचार करुन चालणार नाही. यापुढे देखील जावे लागेल. त्यामुळे यापुढे जे कुणी नाहीत त्यांच्यामुळे शो काही बंद पडणार नाही. आणि त्याचे शुटिंग थांबणार देखील नाही. अशी प्रतिक्रिया मोदी यांनी दिली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या प्रतिक्रियेची जोरदार चर्चा रंगली आहे. यासगळ्यात कलाकार नेमक्या कोणत्या कारणासाठी मालिका सोडत आहे हे कारण मात्र पुढे आलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.