Tollywood News: टॉलीवूडचा केजीएफ (KGF2) हा सध्या चर्चेत आला आहे. तो दोन दिवसांनी प्रदर्शित होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासुन केजीएफची चर्चा सुरु होती. अखेर यशचा हा चित्रपट येत्या शुक्रवारी (Entertainment News) प्रदर्शित होतो आहे. टॉलीवूड सिनेमांची सध्या चर्चा (Tollywood Movies) होताना दिसत आहे. पुष्पापासून केजीएफ 2 पर्यत त्या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. केजीएफचं प्रमोशन जोरात सुरु आहे. 14 एप्रिलला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्तानं एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या प्रकारानं नाराज झालेल्या पत्रकार यशवर नाराज झाल्याचे दिसून आले. अखेर यशला उपस्थित पत्रकारांची माफी मागावी लागली आहे.
केजीएफ 2 ची पत्रकार परिषद सुरु होती. मात्र त्या पत्रकार परिषदेला त्या चित्रपटातून मुख्य अभिनेता यश हा उशिरा पोहचल्याचे दिसुन आले होते. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यशच्या केजीएफच्या पहिल्या पार्टला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर तीन वर्षांपासून या चित्रपटाची वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी 'केजीएफ २' सिनेमाच्या पोस्टमध्ये अभिनेता यश आणि संजय दत्तसोबत अभिनेत्री रवीना टंडनचा लूक समोर आला होता. पोस्टर समोर आल्यानंतर चाहत्यांकडून एकच प्रश्न विचारला जात होता की या सिनेमाचा ट्रेलर आणि टीझर कधी प्रसिद्ध होईल? अशातच यशच्या चाहत्यांसाठी आता एक चांगली बातमी समोर आली होती.
केजीएफसोबत थलायवी विजयचा बिस्ट नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे केजीएफला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळणार का हा प्रश्न केजीएफच्या चाहत्यांना पडला आहे. कारण यश आणि विजय थलापती यांचाही मोठा चाहतावर्ग आहे. नुकतीच जी पत्रकार परिषद आहे. त्याला यश हा दीड तास उशीर आला होता. त्यामुळे कंटाळलेल्या पत्रकारांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. ही पत्रकार परिषदेत आंध्र प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आली होती. यशनं माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या त्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.