RRR Movie: प्रदर्शनापूर्वीच सापडला कायद्याच्या कचाट्यात

ओमीक्रॉनच्या (Omicron) भयानं मनोरंजन (Entartainment) क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
RRR movie
RRR movie
Updated on

ओमीक्रॉनच्या (Omicron) भयानं मनोरंजन (Entartainment) क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. येत्या आठवड्यात जे चित्रपट प्रदर्शित होणार होते त्यांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे चाहते ज्या चित्रपटाची गेल्या दोन वर्षांपासून वाट पाहत होते त्या आरआरआर (RRR Movie) चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आज हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनाच्या संक्रमणामुळे निर्मात्यांनी त्याचं प्रदर्शन पुढे ढकललं आहे. दरम्यान आरआरआरच्या वाटेत आणखी एक अडथळा निर्माण झाला आहे. तो म्हणजे प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादात सापडला आहे.

आरआरआर (RRR) आता कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. त्या चित्रपटांमधील काही दृश्यांमध्ये दिग्दर्शकानं काही समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. तेलंगाणा कोर्टामध्ये या चित्रपटाच्या विरोधात तक्रार दाखल कऱण्यात आली आहे. वास्तव घटनांशी छेडछाड केल्याचा आरोप दिग्दर्शक राजामौली यांच्यावर करण्यात आला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगानातील (Telangana Law College) एका विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आरआरआरच्या विरोधात कोर्टात धाव घेतली आहे. हा एक ऐतिहासिक चित्रपट आहे. त्यात दाखवण्यात आलेल्या व्यक्तिरेखांच्याबाबत दिग्दर्शकानं छेडछेड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी त्या विद्यार्थ्यानं केली आहे. अशावेळी सेंसॉर बोर्डाकडून सर्टिफिकेट कसे मिळाले असा प्रश्नही याचिकाकर्त्यांनं उपस्थित केला आहे.

RRR movie
सुष्मिता सेन ते समंथा.. वर्षभरात 'हे' सेलिब्रिटी पार्टनरपासून झाले विभक्त

कोर्टानं म्हटलं आहे की, आरआरआरच्याबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याविषयी मुख्य न्यायाधीशांच्या मार्फत त्याची सुनावणी केली जाणार आहे. याप्रकरणी आरआरआरच्या मेकर्सकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. एस एस राजमौली दिग्दर्शित या चित्रपटामध्ये ज्युनिअर नटराजन, रामचरण, अजय देवगण, आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पाच भाषांमध्ये हा चित्रपट जगभरामध्ये प्रदर्शित होणार आहे.

RRR movie
Movie Review: नादखुळा 'पुष्पा'!, कडक समंथा, भडक अल्लु अर्जुन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.