ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेर्न वॉर्नचं(Shane Warne) हृद्यविकाराच्या झटक्यानं ४ मार्च,२०२२ रोजी थायलंडमध्ये निधन झालं. तेथील को-सामुई येथील त्याच्या व्हिलामध्ये त्यानं अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनाची बातमी जगभरात वाऱ्यासारखी पसरली अन् त्याच्या अनेक चाहत्यांना धक्का देऊन गेली. केवळ सर्वसामान्य चाहतेच नाहीत बॉलीवूडच्या(Bollywood) अनेक कलाकारांनी शेर्न वॉर्नच्या जाण्यावर दुःख व्यक्त केले आहे. शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty),रणवीर सिंग(Ranveer Singh),अक्षय कुमार(Akshay Kumar),अनिल कपूर(Anil Kapoor),अजय देवगण(Ajay Devgan) अशा अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत शेर्न वॉनच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा हा हरहुन्नरी गोलंदाज ५२ वर्षांचा होता. वॉर्नचं अचानक जाणं त्याचे कुटुंब,मित्र-परिवार आणि चाहत्यांसाठी मोठा धक्का समजला जात आहे. त्याच्या निधनानंतर अनेक बॉलीवूडकरांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. फॉक्स स्पोर्ट्सने सर्वात पहिली शेर्न वॉर्नच्या निधनाची बातमी देताना त्यांच्या वृत्तात म्हटलं होतं की,''ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटवीर शेर्न वॉर्न त्याच्या व्हिलात मृत अवस्थेत आढळला. त्याचे प्राण वाचवायचे अनेक प्रयत्न केले गेले मात्र तो वाचू शकला नाही. त्याचं निधन झालंय''. अशी ती बातमी आली अन् वाऱ्यासारखी पसरली. अनेकांना ही बातमी सुरुवातीला अफवा वाटली होती.
शिल्पा शेट्टीनं सोशल मीडियावर शेर्न वॉर्नच्या निधनानंतर पोस्ट करत लिहिलं आहे,''Legends live on'' आणि तिनं या पोस्टपुढे हार्ट इमोजीही दिला आहे. शेर्न वॉर्न राजस्थान रॉयल्समध्ये असताना त्या दोघांनी एकत्र टीमसाठी खूप काम केलं आहे. शिल्पानं शेर्न वॉर्न सोबतचे खूप फोटोदेखील शेअर केले आहेत. रणवीर सिंगने देखील शेर्न वॉर्नचा फोटो पोस्ट करीत हार्ट ब्रेकिंगचा इमोजी पोस्ट केला आहे. तर दुसरीकडे अक्षय कुमारने शेर्न वॉर्नच्या निधनावर पोस्ट करताना लिहिलं आहे,''शेर्नच्या अचानक जाण्यानं मला दुःख झालं आहे. क्रिकेट विश्व शेर्नशिवाय अनुभवण्यात मजा नाही. शेर्नच्या निधनाची बातमी मन सुन्न करणारी आहे,ओम शांति|''
सनी देओलनेही आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय,''क्रिकेट विश्वातील एका मौलिक हिऱ्याला आपण आज गमावलं. शेर्न वॉर्न तू खूप लवकर जगाचा निरोप घेतलास''. अजय देवगणनेही पोस्ट करीत लिहिलं आहे,''शेर्न वॉर्नच्या निधनाच्या बातमीवर विश्वास ठेवणं कठीण जातंय, बातमी आधी अफवा वाटली होती. शेर्न वॉर्न कायम लक्षात राहिल''.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.