‘शेरशाह’चा ट्रेलर पाहून विक्रम बत्रा यांच्या आई-वडिलांची भावूक प्रतिक्रिया

'कारगिल दिवस'च्या एक दिवस आधी 'शेरशाह' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.
siddharth malhotra film shershah  vikram batras
siddharth malhotra film shershah vikram batras file image
Updated on

'कारगिल दिवस'च्या एक दिवस आधी 'शेरशाह' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (siddharth malhotra) प्रमुख भूमिका साकारत आहे. सिद्धार्थबरोबरच अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) देखील या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे कथानक कारगिल युद्धामध्ये शहिद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा (vikram batra) यांच्या शौर्य गाथेवर आधारित आहे. या चित्रपटाच्या लॉंचच्या कार्यक्रमाला विक्रम यांचा भाऊ उपस्थित होता. काही कारणांमुळे त्यांचे आई-वडिल उपस्थित राहू शकले नव्हते. पण चित्रपटाचा ट्रेलर पाहून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.(trailer of siddharth malhotra film shershah vikram batras parents give reaction pvk99)

विक्रम बत्रा यांच्या आई- वडिलांची प्रतिक्रिया

कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आई-वडिलांनी 'शेरशाह' चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर भावूक प्रतिक्रिया दिली. 'हा चित्रपट म्हणजे एका सैनिकाला खरी श्रद्धांजली आहे', असं ते म्हणाले. विक्रम बत्रा यांचे वडील 77 वर्षांचे आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर त्यांना प्रचंड अभिमान वाटला. ते म्हणाले, 'युद्धावर आधारित असलेले चित्रपट पाहून मला प्रचंड अभिमान वाटतो. आमच्या मुलाच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. त्याच्या बालपणापासून सुरू होणारा संघर्ष त्याचे आयएमए (इंडियन मिलिटरी अकादमी) पर्यंतचा प्रवास आणि शेवटी भारतीय सैन्यात दाखल होतो. हे सर्व या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे. '

पुढे ते म्हणाले, 'हा चित्रपट ‘कारगिल’ युद्धातील नायकांना खरी श्रद्धांजली आहे. शहीदांच्या स्मृतींच्या दस्तऐवजीकरणास बराच विलंब होत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. 'ते कारगिल युद्धानंतर दोन-चार वर्षांत बनले असते, तर योग्य ठरले असते. आम्हाला अजूनही अभिमान वाटतो की, दिग्दर्शकाने कारगिल युद्धातील आमच्या मुलाच्या जीवनावर आधारित जीवनपट बनवला आहे', अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

siddharth malhotra film shershah  vikram batras
लंडनमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीचा नऊवारीचा नखरा

‘शेरशाह’ हा चित्रपट 12 ऑगस्टला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. कारगिलच्या द्रास येथे या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला.

siddharth malhotra film shershah  vikram batras
'तारक मेहता..' सोडण्याच्या चर्चांवर अखेर 'बबिता'चं स्पष्टीकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.