Travel Tips : बॉलीवूडचे चित्रपट असो की टॉलीवूड, ज्या ठिकाणावर या चित्रपटाचं शूटिंग होतं त्याठिकाणी भेट देणं प्रत्येक फिल्मी व्यक्तीची बकेट लिस्ट असते. अशीच भारतातील काही ठिकाणं आहेत, ज्यांची आज आपण माहिती घेणार आहोत.
भारतीय चित्रपटसृष्टीत कोलकात्याला विशेष स्थान आहे. कोलकात्यामध्ये विद्या बालनचा 'कहानी', 'पीकू' या चित्रपटांसह अनेक चित्रपटांचे शूटिंग झालंय. पश्चिम बंगालची राजधानी असलेले शहर कोलकता इथे संपूर्ण संस्कृतीचे दर्शन होते.
अनेक साहित्यकार, बुद्धीमान, महान योद्ध्यांसाठी हे शहर ओळखलं जातं. अनेक महनीय लोकांचे या शहरासोबत अनोखे नाते आहे. सिटी ऑफ जॉय या नावाने कोलकता शहराची खास ओळख आहे. या ठिकाणी फिरणे आणि पर्यटनासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
केवळ हिंदीच नाही तर प्रादेशिक चित्रपटांचं चित्रीकरणही भारताची राजधानी दिल्लीत होताना दिसतं. दिल्लीमध्ये अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. तुम्ही दिल्लीमध्ये गेल्यावर त्यांना भेट देतात.
पण अशी ही काही पर्यटन स्थळ आहेत ज्यांची आपल्याला माहितीच नसते. यात हौज खास किल्ला, दमदमा तलाव, चांदणी चौक, लोटस टेंपल, हुमायूचा मकबरा आदींचा समावेश होतो.
लडाखला जाणं हे जवळपास प्रत्येक भारतीयाचे स्वप्न असेल. आमिर खानचा ‘३ इडियट्स’ ज्यांनी ज्यांनी पाहिला असेल, त्यातला शेवट आजही आठवला तरी आपल्या डोळ्यासमोर एकच गोष्ट उभी राहते ती म्हणजे लडाखच्या उंच पर्वतांच्या मध्ये असलेला तो लेक! या सिनेमामुळे लडाख मध्ये बरीच लोकं येऊ लागले. प्रत्येक भारतीयांचं काश्मीर आणि लडाख सहल हे स्वप्न असतं. तुमचं ही असेलच!
हैदराबादची रामोजी फिल्म सिटी कोणाला माहीत नाही. हैदराबाद शहरापासून सुमारे एक ते दीड तासाच्या अंतरावर हे निसर्गरम्य ठिकाण आहे.
आजपर्यंत येथे तीन हजारांहून अधिक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. गाव-खेड्यापासून ते विदेशातल्या चकाचक लोकेशन्ससह विमान ते रेल्वेस्थानक अशी नानाविध लोकेशन्स येथे उपलब्ध आहेत.
सुमारे १५ हजार एकरात उभारलेल्या या फिल्म सिटीची नोंद गिनिज बुकमध्येही झाली आहे. इथे जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ कॉम्प्लेक्स आहे. यामुळेच येथे अनेक बॉलिवूड, टॉलिवूड फिल्म निर्मात्यांची मोठी सोय झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.