Trial By Fire Web Serise Review : काळजावर हात ठेवून पाहावी लागेल 'ट्रायल बाय फायर'!

नेटफ्लिक्सवर सध्या प्रदर्शित झालेल्या ट्रायल बाय फायरनं प्रेक्षकांची झोप उडवून टाकली आहे. प्रचंड अस्वस्थ करणारी ही मालिका खऱ्या घटनेवर आधारित आहे.
Trial By Fire Review
Trial By Fire Review esakal
Updated on

Trial By Fire Review : शेखरला सध्या तरी काही चिंता नाही. तो मस्त सोफ्यावर पेपर वाचत बसला आहे. त्याची पत्नी निलम स्वयंपाक घरात फोनवर कुणाशी वाद घालतेय. मुलं हॉलमध्ये व्हिडिओ गेम्स खेळत आहेत. सगळं काही निवांत आहे. हॅप्पी फॅमिली आहे. पण त्यानंतर अवघ्या मिनिटानंतर जे घडतं ते थरकाप उडवणारं आहे.

नेटफ्लिक्सवर सध्या प्रदर्शित झालेल्या ट्रायल बाय फायरनं प्रेक्षकांची झोप उडवून टाकली आहे. प्रचंड अस्वस्थ करणारी ही मालिका खऱ्या घटनेवर आधारित आहे. दिल्लीमध्ये १३ जुन १९९७ मध्ये उपहार थिएटरला लागलेल्या आगीची हद्यद्रावक घटना आणि त्यात ५९ प्रेक्षकांचा गेलेला जीव. हे सारं सुन्न करणारं आहे. या मालिकेतून यासगळ्या घटनेचा मागोवा घेण्यात आला आहे. पण ते पाहताना काळजावर दगड ठेवावा लागतो. एवढं मात्र नक्की.

Also Read - आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

कदाचित बऱ्याजणांना आठवत नसेल तो काळ जेपी दत्तांच्या बॉर्डरचा होता. तो चित्रपट आला आणि त्यानं भारतीय प्रेक्षकांना वेडावून टाकलं. शहराशहरातील, गावागावातील थिएटर्स या चित्रपटानं हाऊस फुल्ल करुन टाकले होते. बॉर्डरचं स्वागत मोठ्या जल्लोषात आणि धुमधडाक्यात झालं होतं.

Trial By Fire Review
Ved Review : रितेश-जेनेलियाचा प्रेमात पाडणारा 'वेड'! अभिनय, गाणी सगळंच 'लई भारी'

प्रेक्षकांची या चित्रपटाला मिळालेली पसंतीही आपल्या सर्वांना माहिती आहे. मात्र हाच बॉर्डर दिल्लीच्या उपहार चित्रपटगृहात पाहायला गेलेल्या त्या ५९ प्रेक्षकांच्या नशीबात काय लिहून ठेवलं होतं हे त्यांनाही माहित नव्हतं. ट्रायल बाय फायरची गोष्ट इथून सुरु होते.

Trial By Fire Review
Kuttey Review : 'कुत्ते' पाहिल्यावर तोंडातून शिव्याच बाहेर पडणार! नुसताच...

शेखर आणि निलम कृष्णमुर्ती यांच्या फायर बाय ट्रायल या पुस्तकावर आधारित असलेल्या मालिकेनं प्रेक्षकांना अंतर्मुख करुन टाकलं आहे. उपहार थिएटरमध्ये त्या दोघांची दोन मुलं उज्ज्वल (१३ वर्ष) आणि उन्नती (१७ वर्ष) यांचा धुरानं गुदमरुन मृत्यु झाला आहे. निलमला जेव्हा फोन येतो तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते. ते दोघेही घटनास्थळी धाव घेतात. त्यांना कळते की, थिएटरमधील व्यक्तींना दिल्लीतील सफदजंग हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. शेखर तिथे गेल्यानंतर जे पाहतो ते त्याला निलमला सांगता येत नाही.

यासगळ्यात सुरु होतो पोलिसांचा तपास, पोलिसांकडून ती केस सीबीआय़कडे सोपवली जाते. कोर्टाच्या फेऱ्या, साक्षीदारांवर आणला जाणारा दबाब, त्यांना दिल्या जाणाऱ्या धमक्या, सीबीआयच्या वकीलाचा मुळमुळीत युक्तिवाद, दुसरीकडे शेखरनं काही झालं तरी आपल्या मुलांच्या मृत्युचा बदला घेतल्याशिवाय शांत न बसण्याचा निर्धार हे सारं आपल्याला चक्रावून टाकणारं आहे. एकुण सात भागातील ही मालिका क्षणोक्षणी आपल्याला हादरवून टाकते.

Trial By Fire Review
Taaza Khabar Twitter Review : चाहत्यांना 'वसंत गावडे' आवडला, भुवन बाम भाव खावून गेला!

शेखर - निलमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. त्यामुळे ते दिल्लीतील बलाढ्य अशा बन्सल बिल्डर, उद्योपतीविरोधात उभे राहतात. पोलीस एफआयआऱला नोंदवून घ्यायला तयार नसतात अशावेळी निलमनं दिलेला लढा कौतूकास्पद आहे. आपल्या मुलांच्या हत्येत दोषी असणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी आई वडिलांना कशाप्रकारे जीवघेणा संघर्ष करावा लागतो हे ट्रायल बाय फायर पाहिल्यावर लक्षात येते.

निमित्त होतं जे पी दत्तांच्या बॉर्डर चित्रपट पाहायला जाण्याचं. मुलांनी जेव्हा हा चित्रपट पाहायला आग्रह केला तेव्हा शेखरनं देखील मला तो चित्रपट पाहायला आवडेल असे सांगितलंही. पण मुलांनी ती गोष्ट काही ऐकली नाही आणि ती घरातून बाहेर पडली होती. वेबसीरिजचा वेग, कथा. त्याचे दिग्दर्शन, छायाचित्रण, संवाद सगळं काही प्रभावी आहे. यात आवर्जुन उल्लेख करावा लागेल तो या मालिकेतील कलाकारांचा.

अभय देओल, राजश्री देशपांडे, अनुपम खेर, आशिष विद्यार्थी, शिल्पा शुक्ला, रत्ना पाठक शहा, राजेश तैलंग यांनी जबरदस्त काम केले आहे. खासकरुन राजश्री देशपांडेच्या भूमिकेचे कौतूक करावे लागेल. बऱ्याचजणांनी तिची ओळख ही अनुराग कश्यपच्या सेक्रेट गेम्समधून झाली असेल. पण ही सीरिज पाहिल्यानंतर कळेल की राजश्री काय ताकदीची अभिनेत्री आहे ती. अभय देओलनं त्याच्या वाट्याला आलेल्या भूमिकेला पूर्णपणे न्याय दिला आहे.

Trial By Fire Review
Cirkus Review: रणवीरच्या नाठाळ 'माकडउड्या', सर्कशीचा 'खेळखंडोबा'!

१३ जुन १९९७ साली घडलेल्या त्या घटनेला किती वेगवेगळे अँगल होते हे ही सीरिज पाहिल्यानंतर लक्षात येते. तपासयंत्रणेवर असलेला राजकीय दबाव, न्यायदानासाठी होणारा विलंब, साक्षीदारांना दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि शेखर - निलमच्या वाट्याला येणारा जीवघेणा संघर्ष आपल्याला चीड आणतो. ही मालिका बघताना आपण अजुनही नेमकं कोणत्या काळात राहतो आहोत, जगतो आहोत हा प्रश्न पडण्यास दिग्दर्शक भाग पाडतो हे त्या मालिकेचे वेगळे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

Trial By Fire Review
Avatar The Way Of Water Review: तिकीट कितीचे का असेना, 'अवतार' खूश करतोच! अविस्मरणीय अनुभव

ट्रायल बाय फायर ही वेबसीरिज प्रशांत नायर, रणदीप झा आणि अवनी देशपांडे या तीन दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केले आहे. त्यांनी ही मालिका जास्तीत जास्त लोकांना कशी भावेल या दृष्टीनं त्याची केलेली बांधणी एवढी घट्ट आहे की ती तुमच्या मनाचा ताबा घेतल्याशिवाय राहत नाही. हल्लीच्या सोशल मीडियाच्या भ्रमजालात बऱ्याचशा स्वप्नाळु विषयांना हात घालणाऱ्या मालिकांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता, एकदा फायर बाय ट्रायल पाहिल्यावर बराचवेळ डोकं भणभणतं राहतं.

सीरिजचे नाव - फायर बाय ट्रायल

कलाकार - अभय देओल, राधिका देशपांडे, अनुपम खेर, रत्ना पाठक शहा,

दिग्दर्शक - प्रशांत नायर, रणदीप झा आणि अवनी देशपांडे

रेटिंग - ३.५ स्टार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.