Tu Jhoothi Main Makkaar Twitter Review:कसा वाटला पब्लिकला 'तू झूठी-मै मक्कार'..रणबीर-श्रद्धाला पाहून म्हणाले..

लव रंजन दिग्दर्शित 'तू झूठी मै मक्कार' सिनेमाच्या माध्यमातून रणबीर-श्रद्धा पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
Ranbir Kapoor & Shaddha Kapoor
Ranbir Kapoor & Shaddha KapoorInstagram
Updated on

Ranbir Kapor आणि श्रद्धा कपूर अभिनित 'तू झूठी मै मक्कार' आज ८ मार्च रोजी सिनेमागृहात रिलीज झाला आहे, या रोमॅंटिक-कॉमेडी जॉनरच्या सिनेमाचं दिग्दर्शन लव रंजननं केलं आहे. लव रंजनने याआधी 'प्यार रा पंचनामा', 'प्यार का पंचनामा २', 'सोनू के टीटी की स्वीटी' सारखे हिट सिनेमे दिले आहेत.

रणबीर आणि श्रद्धा पहिल्यांदा या सिनेमाच्या निमित्तानं मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या दोघांव्यतिरिक्त सिनेमात अनुभव सिंग बस्सी,डिंपल कपाडिया आणि बोनी कपूर देखील आहेत.

चला जाणून घेऊा पब्लिकला कसा वाटला हा सिनेमा...तेव्हा हे जाणून घेण्यासाठी वाचा 'तू झूठी,मै मक्कार' सिनेमाचे ट्वीटर रिअॅक्शन..(Tu Jhoothi Main Makkaar Twitter Review)

Ranbir Kapoor & Shaddha Kapoor
Women's Day 2023: 'कुणी नसलं तरी चालेल..तुझी तू रहा..', जागतिक महिला दिनी मधुराणीची खास पोस्ट चर्चेत

मीडियाशी केलेल्या संवादा दरम्यान रणबीर कपूर म्हणाला-''जेव्हा तुम्ही रोमकॉम जॉनरच्या सिनेमात काम करता तेव्हा तुम्हाला वाटतं की हे खूप सोपं असेल. पण या सिनेमाचा प्रत्येक सीन आणि गाणं करताना मला खूप मेहनत घ्यावी लागली होती. सिनेमाचं शूटिंग तसं पाहिलं तर १२० दिवसांत पूर्ण होतं. पण आम्ही हा सिनेमा १८० दिवसांत पूर्ण केला..ते सुद्धा स्क्रिप्टशिवाय..''

Ranbir Kapoor & Shaddha Kapoor
Ranbir Kapoor: स्क्रिप्टशिवाय शूट केलाय 'तू झूठी,मै मक्कार' सिनेमा.. कसं जमलं सगळं..काय म्हणाला रणबीर..

ट्वीटरवर 'तू झूठी मै मक्कार' सिनेमाला मिळालेले पब्लिक रिअॅक्शन पाहता एवढं तर नक्की की सिनेमा लोकांचं मनोरंजन करत आहे आणि कदाचित 'पठाण' नंतर बॉक्सऑफिसला आणखी एक हिट मिळू शकतो. तसंच,सिनेमाला होळीच्या सणाचा देखील फायदा होऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.