Anup Ghosal Death: 'तुझसे नाराज नही जिंदगी' फेम गायक अनूप घोषाल यांचे निधन

'तुझसे नाराज नही जिंदगी' फेम बंगाली गायक अनूप घोषाल यांचे निधन! ममता बॅनर्जींनी व्यक्त केला शोक
Anup Ghosal Death
Anup Ghosal DeathEsakal
Updated on

Anup Ghosal Death: मनोरंजन विश्वातून दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध बंगाली गायक आणि तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार अनुप घोषाल यांचे शुक्रवारी निधन झाले. 1983 मध्ये आलेल्या 'मासूम' या चित्रपटातील 'तुझसे नाराज नही जिंदगी' या गाण्याला त्यांनी आपला आवाज दिला होता. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

वयाशी संबंधित आजारांमुळे त्यांना कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी 1.40 वाजता त्यांनी जगाचा निरोप घेतला. गायकाच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही अनूप घोषाल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनुप घोषाल यांच्या निधनाने संगीत जगताची मोठी हानी झाली आहे.

Anup Ghosal Death
Viral VIdeo: ऐश्वर्याची आराध्या-करिनाचा तैमूर अन् शाहरुखचा अबराम! अंबानी शाळेच्या वार्षिक सोहळ्याला स्टार किड्सची हवा

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, अनुप घोषाल हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारांने त्रस्त होते, त्यामुळे त्यांना कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले.

तपन सिन्हा सारख्या दिग्दर्शकांच्या चित्रपटात त्यांनी गाणे गायले होते. अनूप घोषाल यांनी सत्यजित रे यांच्या 'गुपी गायन, बाघा बायन' (1969) आणि 'हिरक राजार देशे' (1980) ला आपला आवाज दिला आहे.

Anup Ghosal Death
'तुझ्यासारख्या मुलीचीच वाट...' 'सुपरस्टार'नं उर्फी जावेदला घातली लग्नाची मागणी!

अनुप घोषाल यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "बंगाली, हिंदी आणि इतर भाषांमध्ये गाणारे अनुप घोषाल यांच्या निधनाबद्दल मी तीव्र दु:ख आणि शोक व्यक्त करते. उस्ताद घोषाल यांची कारकीर्द वयाच्या अवघ्या चार वर्षापासून सुरू झाली. त्यांची आई लावण्य घोषाल यांनी त्यांचे पालनपोषण केले."

Anup Ghosal Death
Vaishnavi Dhanraj Abused: 'सीआयडी' फेम अभिनेत्रीला मारहाण! जखमी अवस्थेत गाठले पोलिस स्टेशन

यासोबतच 2011 च्या विधानसभा निवडणुकीत अनुप हे उत्तरपारा मतदारसंघातून विजयी झाले. त्यांचा पश्चिम बंगाल सरकारने 2011 मध्ये ‘नझरूल स्मृती पुरस्कार’ आणि 2013 मध्ये ‘संगीत महासन्मान’ पुरस्कार देत गौरव केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.