टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मानं काल मुंबईत शूटिंगच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
Tunisha Sharma News : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मानं (Tunisha Sharma) काल (शनिवार) मुंबईत शूटिंगच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली. अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर सहकलाकार शीजान खानवर (Sheezan Khan) आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होत होता.
त्याचबरोबर याप्रकरणी मोठी कारवाई करत वालिव पोलिसांनी अभिनेत्री तुनिशा शर्माचा सहकलाकार शीजान खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केलीये. पोलिसांनी (Waliv Police) शीजानविरुद्ध भादंवि कलम 306 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
दरम्यान, अभिनेत्री तुनिषा शर्मानं आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकलेलं नाहीये. त्याचवेळी वालिव पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कतरिना कैफच्या 'फितूर' या चित्रपटात तुनिषानं तिच्या बालपणीची भूमिका साकारली होती. याशिवाय, तिनं बार बार देखो, कहानी-2, दबंग-3 या चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
तुनिशाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी शीजानला अटक केली असून आज त्याला वसईच्या कोर्टात हजर केलं जाणार आहे. शीजान हा तुनिशाचा सहकलाकार आहे. या दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र, त्यांचा ब्रेकअप झाल्यामुळं तुनिशा तणावाखाली होती. त्यातूनच तिनं हे टोकाचं पाऊल उचल्याचं बोललं जात आहे.
शीजान खान हा अभिनेत्री नाजचा भाऊ आहे. तो टीव्ही कलाकार असून मॉडलही आहे. शीजानचा जन्म 9 सप्टेंबर 1994 ला मुंबईत झाला. शीजाननं मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली असून शीजाननं त्याच्या अभिनयाची सुरुवात 2013 मधून केली. ऐतिहासिक नाटक जोधा अकबरपासून त्यानं आपल्या करिअरची सुरुवात केली.
2016 मध्ये शीजाननं सिलसिला प्यारमध्ये काम केलं होतं. त्यानंतर 2017 मध्ये त्यानं चंद्र चांदनी या नाटकात काम केलं. 2018 मध्ये पृथ्वी वल्लभमध्ये त्यानं प्रिन्स कार्तिकेयची भूमिका साकारली होती. त्यानंतर तो अलीबाबा दास्तान ए काबूलमध्ये तुनिशा शर्मासोबत लीड रोलमध्ये दिसून आला होता. शीजानच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तुनिशासोबतचे त्याचे भरपूर फोटो आणि व्हिडिओ आहेत. त्यामुळं दोघांची चांगलीच केमिस्ट्री जमत असल्याचं दिसून येतं. मात्र, तुनिशानं का आत्महत्या केली याचा अद्याप कोणताही उलगडा झालेला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.