Tunisha Sharma Death: 'तुनिषाच्या मृत्यूला जबाबदार...', सोफिया हयातच्या विधानानं टी.व्ही इंडस्ट्रीत खळबळ

तुनिषा शर्मानं अवघ्या २० व्या वर्षा मालिकेच्या सेटवर आत्महत्या करुन आयुष्य संपवल्यानं सर्वच स्तरावरनं वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
Tunisha Sharma Death Case Sofia Hayat blames makers
Tunisha Sharma Death Case Sofia Hayat blames makersGoogle
Updated on

Tunisha Sharma Death: बिग बॉस फेम सोफिया हयातने ही टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या दुःखद निधनाबद्दल आपले मत जाहिरपणे मांडले आहे. सोफियाने या प्रकरणात मालिकेच्या निर्मात्यांना दोष देत त्यांच्यावर आरोप करत काही प्रश्न निर्माण केले आहेत. (Tunisha Sharma Death Case Sofia Hayat blames makers)

Tunisha Sharma Death Case Sofia Hayat blames makers
Bhumi Pednekar: 'माझ्या अंगावर कपडे नव्हते अन्..', लस्ट स्टोरीज मधील इंटीमेट सीनविषयी भूमीचा मोठा खुलासा

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हीनं मालिकेच्या शुटिंग दरम्यान सेटवरच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी 24 डिसेंबर,2022 ला घडली. 20 वर्षीय अभिनेत्रीच्या मृत्यूची बातमी ऐकून सगळ्यांना हादरा बसला. सोफियाला खूप दु:ख झाले आणि टीव्ही शोच्या निर्मात्यांनी तरुण अभिनेत्रींना त्यांच्याहून जास्त वयाच्या पुरुषासोबत रोमान्स करण्यासाठी कास्ट केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. तिला असे वाटते की तेच खरे गुन्हेगार आहेत आणि ते तरुण मुलींचा वापर सहज कशासाठीही करून घेतात.

Tunisha Sharma Death Case Sofia Hayat blames makers
Bigg Boss Marathi 4: होते अक्षय आणि प्रसाद म्हणून वाचली अमृता..नाहीतर राखीनं तर धोंगडेला..

सोफिया हयात म्हणाली, “ जेव्हा आपण तरुण कलाकारांच्या अयशस्वी नातेसंबंधांमुळे आत्महत्या केल्याच्या बातम्या वाचतो तेव्हा वाईट वाटते. या प्रकरणांमध्ये निर्मातेच दोषी आहेत असे मला वाटते. ते तरुण अभिनेत्रींना भूमिका तर देतात पण अगदी कोवळ्या वयात त्यांना त्यांच्याहून जास्त वयाच्या अभिनेत्यांसोबत कास्ट करतात आणि त्यांच्या प्रोजेक्टमध्ये ठासून रोमान्स भरतात''.

Tunisha Sharma Death Case Sofia Hayat blames makers
Chaavi Mittal: छवी मित्तलने दाखवले ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीचे व्रण, म्हणाली,'हीच या वर्षाची कमाई..'

नुकतीच अभिनयाला सुरुवात केलेली आणि अनुभवी कलाकार नसलेली ही मुलं शूटिंगच्या वेळी सेटवर सहज स्वतःला झोकून देतात आणि अशावेळी वयानं मोठ्या पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवतात आणि ते त्यांना पटवून देतात की इंडस्ट्रीमध्ये लैंगिक संबंध ठेवणे हे चुकीचं नाही आहे. अशातच तरूण मुली मग वाट चुकतात..असं देखील सोफिया म्हणाली.

Tunisha Sharma Death Case Sofia Hayat blames makers
Marathi Serial: 'जेव्हा कारमधले सीन शूट होतात तेव्हा..', जुई गडकरीनं शेअर केली पडद्यामागची कसरत

ती पुढे म्हणाली की,''मी स्वतःही अशाच परिस्थितीतून गेली आहे कारण मला पण असे निर्माते माहित आहेत. या निर्मात्यांना अनुभवी कलाकार घेतले तर जास्त पैसे मोजावे लागतात आणि हे नवीन कलाकार कमी पैशात काम करतात आणि ते कोणत्याही गोष्टीला नकार देत नाही तर हेच शोच्या निर्मात्याला हवे असते. पुढे त्या कलाकारांचे काहीही होवो,यांना त्याची काहीही पडलेली नसते''.

Tunisha Sharma Death Case Sofia Hayat blames makers
Pathaan Controversy: 'पठाण' मध्ये बदलणार दीपिकाची 'भगवी बिकिनी'? सेन्सॉर बोर्डानं सुचवले 'हे' बदल..

''इतके सगळे होऊनही शोचे निर्माते गप्प का आहेत आणि त्यांच्याकडून या प्रकरणावर कोणतेही योग्य विधान का जाहीर केले गेले नाही? पैसा हेच फक्त त्यांचे ध्येय आहे का?, जसं आधीच्या कितीतरी घटना जशा दाबल्या गेल्या तसंच तुनिषाच्या केसबाबतीत होईल. पण मला वाटतं भविष्यात हे घडण्यापासून रोखण्यासाठी कलाकारांनी आताच काहीतरी केले पाहिजे''. सोफियाच्या या बेधडक वक्तव्यांमुळे टी.व्ही इंडस्ट्रीत मात्र खळबळ उडाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()