Tunisha Sharma Death Case: 'आई मला शिझान हवाय गं! शेवटपर्यत माझी मुलगी...' आता ती गेली

टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्मानं आत्महत्या केल्यानं पुन्हा एकदा वेगळयाच चर्चेला सुरुवात झाली आहे.
Tunisha Sharma Death Case
Tunisha Sharma Death Caseesakal
Updated on

Tunisha Sharma Suicide Case Updates: टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्मानं आत्महत्या केल्यानं पुन्हा एकदा वेगळयाच चर्चेला सुरुवात झाली आहे. या प्रकरणात तुनिषाच्या आईची प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी काही धक्कादायक खुलासे याप्रकरणाबाबत केले आहे.

तुनिषानं तिच्या आईला सांगितलं होतं की, माझ्या आयुष्यात असा कोणी एक खास आहे की त्याविषयी तिनं मला सांगितलं होतं. तो म्हणजे शिजान होता. ती त्याच्या प्रेमात होती. मला वाटतं त्यानं पुन्हा माझ्याकडे परत यावे. काही कारणामुळे त्यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे तुनिषाला वाईट वाटले होते. त्यानंतर तुनिषा माझ्याशी बोलली होती. तिनं तिच्या मनातील बऱ्याचशा गोष्टी माझ्याशी शेयर केल्या होत्या. असे तुनिषाच्या आईनं सांगितले होते.

Also Read- Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Tunisha Sharma Death Case
Tunisha Sharma: 'कुछ तो गडबड है...'AICWA अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

त्या शिजानला शिक्षा झालीच पाहिजे....

मला त्या शिजानला सांगायचे आहे की, जर त्याला असेच वागायचे होते तर त्यानं असं का केलं. त्याच्या अनेक अटी होत्या. त्यांच्या रिलेशनशिपमध्ये सगळं आलबेल होते असेही नाही. मला तर तुनिषा ही नेहमीच सांगायची, आई मला शिजान हवा आहे. त्याच्याशी मला लग्न करायचे आहे. मात्र तुनिषानं असं का केलं याचं उत्तर शिजानच देऊ शकतो. हे मला सांगायचे आहे. त्यामुळे तपासातून साऱ्या गोष्टी समोर येतील. त्याला तर तुनिषाचा विश्वासघातच करायचा होता तर त्यानं तिच्या आयुष्यात याचचं नव्हतं. अशा शब्दात तुनिषाच्या आईनं त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Tunisha Sharma Death Case
Viral Video : सायकलवाला चाय! दिवसा अभ्यास, रात्री चहा विकणे; तरूणाचा प्रेरणादायी संघर्ष

तुनिषाच्या आईनं काहीही झालं तरी त्या शिजानला शिक्षा व्हायलाच हवी. असं म्हटलं आहे. आता माझी मुलगी गेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ती नैराश्यात होती. तिनं मला त्याच्याविषयी सांगितलंही होतं. तुनिषा तर आता आपल्यात नाही. पण माझी सरकारकडे मागणी आहे की, त्यांनी मला तातडीनं न्याय द्यावा. पोलिसांवर माझा विश्वास आहे. ते त्यांचा तपास योग्य पद्धतीनं करतील. त्यांना योग्य ते सगळं सहकार्य आपण करणार असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.