अभिनेत्री तुनिषा शर्मा हीनं 'अली बाबा : दास्ताँ-ए-काबूल' या सिरियलच्या शुटिंग दरम्यान सेटवरच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. तुनिषानं अवघ्या २०व्या वर्षीच आपलं जीवन संपवल्यानं टीव्ही क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. खून आणि आत्महत्या या दोन्ही एँगलने पोलिस तपास करणार आहेत. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून टीव्ही क्षेत्रातील आणि बॉलिवूडमधील स्टार्स मध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे.
सिल्क स्मिता
डर्टी पिक्चर चित्रपटाने साऊथची आयटम गर्ल सिल्क स्मिताला बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध केले. सिल्क स्मिता अतिशय गरीब कुटुंबातील होती. ती ७० आणि ८० च्या दशकात प्रत्येक तमिळ आणि तेलुगू चित्रपटात आयटम नंबर करत असे. 17 वर्षे 450 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या रेशमने चित्रपटाची निर्मिती सुरू केली आणि त्यात तिला खूप त्रास सहन करावा लागला. आर्थिक समस्या आणि नैराश्यामुळे त्यांनी 23 सप्टेंबर 1996 रोजी चेन्नई येथे आपले जीवन संपवले.
प्रत्युषा बॅनर्जी
टीव्ही मालिका बालिका वधू अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने तिची कारकीर्द गाजत असताना आत्महत्या केली. या मालिकेतून तिला नवी ओळख मिळाली आणि तिने चाहत्यांच्या हृदयावर राज्य करायला सुरुवात केली. प्रत्युषाने 2010-2016 दरम्यान अनेक पुरस्कारही जिंकले. झलक दिखला जा (सीझन-5), बिग बॉस, ससुराल सिमर का यासह काही टीव्ही मालिका तिची ओळख बनली होती. 1 एप्रिल 2016 रोजी ती घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. तिच्या आत्महत्येने अनेकांना धक्का बसला.
नफिसा जोसेफ
मिस इंडिया नफिसा जोसेफ ही एक प्रसिद्ध मॉडेल होती. २६ वर्षीय नफिसा तिचा प्रियकर उद्योगपती गौतम खंडुजासोबत लग्न करणार होती. पण लग्नाआधीच दोघांचं ब्रेकअप झालं होतं नफिसाला हे सहन झाले नाही आणि तिने 29 जुलै 2004 रोजी मुंबईतील तिच्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली.
सेजल शर्मा
टीव्ही अभिनेत्री सेजल शर्माने 24 जानेवारी 2020 रोजी आत्महत्या करून आपले जीवन संपवले. तिच्या आत्महत्येने इंडस्ट्रीला धक्का बसला. 'दिल तो हैप्पी है जी' या टीव्ही सीरियलमधून तिला ओळख मिळाली
जिया खान
अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्यासोबत 'निशब्द' आणि 'गजनी' चित्रपटात दिसलेल्या जिया खानने 3 जून 2013 रोजी राहत्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. निशब्दमध्ये ती पहिल्यांदा दिसली. तिच्या आत्महत्येचं कारण अदयापही स्पष्ट नाही.
कुलजीत रंधावा
प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री कुलजीत रंधावाने 8 फेब्रुवारी 2006 रोजी तिच्या घरात मृतावस्थेत आढळून आली होती. पंख्याला गळफास घेऊन त्यांनी आपला जीव दिला होता. 'रिश्ते', 'आहट', 'सरहदें', 'कहता है दिल', 'कुमकुम: एक प्यारा सा बंधन', 'कोहिनूर' यांसारख्या मालिकांमधून तिनं यशाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली.
शिखा जोशी
मॉडेल, अभिनेत्री आणि कथ्थक नृत्यांगना शिखा जोशीने 2013 मध्ये बीए पास या चित्रपटात काम केले होतं. ती तिच्या करिअरबाबत महत्त्वाकांक्षी होती. पण काही प्रोजेक्टमधून काढून टाकणे, प्रेमात आलेले अपयश या काही कारनांमूळं शिखा नैराश्यात गेली. 16 मे 2015 रोजी त्यांनी मुंबईतील फ्लॅटमध्ये आत्महत्या केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.