Akanksha Juneja: ऑनलाईन फूड मागवणं पडलं महागात! अभिनेत्रीला घातला हजारोंचा गंडा..

Akanksha Juneja:
Akanksha Juneja: Esakal
Updated on

TV Actress Akanksha Juneja Duped While Ordering Food Online: देशात अनेक ऑनलाईन फसवणुकीच्या बातम्या दिवसेंदिवस समोर येत असतात. सायबर क्राईमच्या घटनेतही रोज वाढ होत आहे. यातच सामान्य माणसांपासून तर सेलिब्रिटींनाही याचा फटका बसला आहे. नुकतीच अशीच घटना एका प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्रीसोबत घडली आहे.

Akanksha Juneja:
PM Modi : मोदींनी सनातन धर्मासाठी.. रामलल्लाचे दर्शन घेतल्यावर दीपीका चिखलीयांनी केलं पंतप्रधानांचं कौतुक

'साथ निभाना साथिया' आणि 'कुंडली भाग्य' या टीव्ही मालिकांच्या माध्यमातुन घरघरात पोहचली आहे.आकांक्षा सध्या 'कुंडली भाग्य'मालिकेत निधीची भूमिका साकारत आहे. आकांक्षाची ऑनलाईन फसवणुक झाल्याची माहिती समोर आलीआहे. सायबर फसवणुकी झाल्यामुळे तिचे खुप मोठे नुकसान झाले आहे.

तिने ऑनलाईन जेवणाची ऑर्डर देतांना तिची फसवणूक करण्यात आली आणि तिला तब्बल 30 हजारांचा गंडा घालण्यात आला आहे. आकांक्षाने स्वत: याबाबत माहिती दिली आहे.

Akanksha Juneja:
Baipan Bhaari Deva : बाईपण भारी देवा सिनेमानंतर आणखी एका मराठी सिनेमाची बॉक्स ऑफीसवर 'अफलातुन' कमाई

मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षाने जेव्हा जेवणाची ऑर्डर दिली त्यानंतर तिला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला, ज्याने तिला तो त्याच फूड डिलिव्हरी अॅपचा कर्मचारी असल्याचं सांगितलं.

त्याने कॉलरने आकांक्षा एक लिंक पाठवली आणि तिची ऑर्डरची कर्फम करण्यासाठी त्या लिंकवर क्लिक करायला सांगितलं. जेव्हा आकांक्षाला शंका आली तेव्हा तिने कॉल करणाऱ्याला याबाबत प्रश्न केला, तेव्हा समोरुन तिला हा प्रोटोकॉल असल्याचं सांगितलं गेलं.

त्याने आग्रह केल्याने आकांक्षाने लिंकवर क्लिक केलं. आकांक्षाने लिंकवर क्लिक करताच तिच्या बँक खात्यातून पैसे कापले जाऊ लागले.

तिने लिंकवर क्लिक करताच दर 5 मिनिटांनी तिच्या खात्यातून 10,000 कापले जात होते. त्यानंतर तिने लगेचच बँकेशी संपर्क केला आणि तिची ऑनलाईन फसवणुक झाल्याची माहिती दिली. त्यामुळे आकांक्षाने तिचे बँके खाते तातडिने ब्लॉक केले. मात्र, तोपर्यंत तिच्या खात्यातून 30 हजार रुपये कापले गेले होते.

Akanksha Juneja:
And We’re Engaged! स्वानंदीने शेअर केला आशिषसोबतचा साखरपुड्याचा फोटो

या घटने बद्दल बोलतांना आकांक्षा म्हणाली की, जेव्हा तुम्ही मेहनतीने कमवलेला पैसा विनाकारण जाते तेव्हा खूप त्रास होतो. आकांक्षाने तिच्या चाहत्यांना आवाहनही केलं की कोणत्याही अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.