Tv Entertainment : चार दिवसांत सहा सेलिब्रेटीज गेले! कुणाचा अपघात तर कुणी बाथरुममध्ये... त्या सगळ्याचं कनेक्शन?

टीव्ही मनोरंजन विश्वासाठी धक्कादायक बातम्या गेल्या काही दिवसांपासून समोर येताना दिसत आहे. मागील चार दिवसांत सहा सेलिब्रेटींचे निधन झाले आहे
Tv Entertainment
Tv Entertainment esakal
Updated on

Vaibhavi Upadhyay Death : टीव्ही मनोरंजन विश्वासाठी धक्कादायक बातम्या गेल्या काही दिवसांपासून समोर येताना दिसत आहे. मागील चार दिवसांत सहा सेलिब्रेटींचे निधन झाले आहे यामध्ये एकाचा अपघात, एकाची आत्महत्या तर अनेकांना आजारपणामुळे जीव गमवावा लागला आहे.

टीव्ही स्टार आदित्य सिंह राजपूतच्या मृत्यूनं चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर वैभवी उपाध्यायनं देखील जगाचा निरोप घेतल्याचे दिसून आले. या धक्क्यातून चाहते सावरत नाही तोच प्रसिद्ध अभिनेता नितेश पांडे यांचा हदयविकाराच्या धक्क्यानं निधन झाले आहे. त्यांच्या मृत्यूची वार्ता समोर येताच चाहत्यांनी शोक प्रगट केला आहे. काही सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर त्यांना आदरांजली वाहिली आहे.

Also Read - Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!

विशेष म्हणजे आतापर्यत ज्या सेलिब्रेटींचे निधन झाले आहे त्यातील बहुतांशी हे टीव्ही मनोरंजन विश्वातील कलाकार आहेत. वेगवेगळ्या मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करुन लाईमलाईटमध्ये आलेल्या त्या कलाकारांनी एक्झिट घेतली आहे.

साराभाई वर्सेस साराभाईमध्ये जॅस्मिनची भूमिका करणाऱ्या वैभवी उपाध्यायनं वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. तिचा हिमाचल प्रदेशमध्ये अपघात झाला. तर ५१ वर्षांच्या नितेश यांच्या मृत्यूनं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हदयविकाराच्या धक्क्यानं त्यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे.

२२ मे रोजी स्प्लिटसविला फेम अभिनेता आदित्य राजपूतचा मृत्यू झाला. अंधेरीतील त्याच्या राहत्या घरी त्याचा मृत्यू झाल्यानं त्याबाबत वेगवेगळ्या प्रकारचा संशय व्यक्त केला आहे. बाथरुममध्ये पडून त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. २१ मे रोजी बंगाली टीव्ही मनोरंजन विश्वातील अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ता यांचे निधन झाले. अपघातात त्यांची प्राणज्योत मालवल्याचे सांगण्यात आले.

Tv Entertainment
Aryan Khan : आर्यन प्रकरणात मुख्य आरोपी केपी गोसावीच; प्रभाकर साईलच्या वकिलांची माहिती, तर...

याशिवाय साऊथ चित्रपट विश्वातील सरश बाबू यांचेही निधन झाल्याची बातमी समोर आली. तमिळ आणि तेलुगू चित्रपटांतून आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या सरथ बाबू यांच्या निधनानं त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. तसेच तेलुगू मनोरंजन विश्वातील संगीतकार राज उर्फ थोटकुरा सोमराजू यांचे निधन झाले आहे. बाथरुममध्ये घसरुन पडल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचे सुत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.