सध्या टीव्ही जगातातील सर्वात लोकप्रिय आणि चर्चेत असलेला रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' मध्ये गेल्या काही दिवसांपासून चांगलाच रंगला आहे. येत्या काही दिवसांत शोमध्ये उलथापालथ झालेली दिसतेय. नुकतेचं शोमध्ये अर्चना गौतम आणि शिव ठाकरे यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. शिवसोबतच नाही गेल्या काही दिवसांपासून अर्चना घरात फक्त इतरांशी भांडताना दिसत होती.
कधी शिवसोबत तर कधी प्रियंकासोबत अर्चनाचे खटके उडताना दिसत होते. सुंबुलसोबतचं अर्चनाचं भांडण तर एकदम टोकाचं होतं. त्यानंतर तिने शिवसोबत भांडतांना कहरच केला. अर्चनाने शिवाचा गळा पकडला. यानंतर घरात बराच गोंधळ झाला आणि अर्चनाला बिग बॉसच्या सर्वात मोठ्या नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल शोमधून बाहेर फेकण्यात आले
त्याच आता परत शोमध्ये मोठं ट्विस्ट आलं आहे. तिची या शोमध्ये पुन्हा एंन्ट्री करण्यात आली आहे. आता शुक्रवार का वार मध्ये सलमान खानने अर्चनाला घरात वापस बोलावलं आहे. सलमानने शिवला आपली चूक लक्षात आणून दिल्यानंतर त्याने अर्चनाला वैयक्तिक शेरेबाजी करत चेतावणी दिली, सलमान खानने अर्चनाला घरात परत आणले आणि म्हटले आहे की ती एक मजबूत खेळाडू आहे. तसेच अर्चनाला भडकावल्याबद्दल सलमानने शिवलाही चांगलच फटकारलं. त्याने अर्चनाला भडकवल्यामूळे ती इतकी ती हिंसक असल्याचं सलमाननं म्हटंल आहे.
त्याचबरोबर आता अर्चनाची शोमध्ये झालेली वापसी अनेकांना खटकली आहे. घरात एक वेगळेच वातावरण पाहायला मिळत आहे. एकीकडे, प्रियांका अर्चनाच्या येण्याने खूप खुश आहे ती अर्चनाला सांगते की त्यांचे सर्वांचे चेहरे उतरले आहेत, तर दुसरीकडे साजिद कुटुंबातील इतर सदस्यांशी बोलताना दिसतोय की ती आता मर्यादा ओलांडणार आहे. यावर निमृत म्हणते की बघू किती पुढे काय होइल यातच तर मज्जा आहे. त्यामूळे आता शोमध्ये पुन्हा मोठं महायूद्ध तर होणार नाही ना हे पाहणं उत्सूकतेचं ठरेलं
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.