Poet Surender Sharma: टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये ज्यांच्या विनोदानं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन होते अशा पंजाबी कॉमेडियन कवी सुरेंदर शर्मा यांच्या निधनाची (tv entertainment news) बातमी व्हायरल झाली होती. त्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला होता. सोशल मीडियावर वाऱ्यासारखी ती बातमी पसरली होती. कित्येकांना त्या बातमीवर विश्वासच बसला नाही. त्यावरुन साक्षात विनोदवीर (social media news_ कवी शर्मा यांनी खास व्हिडिओ शेयर केला आहे. त्यात त्यांनी आपण जिवंत असल्याचे सांगितले आहे. यापूर्वी अनेक बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींच्या निधनाच्या खोट्या अफवा व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे.
सोशल मीडियावर यापूर्वी प्रसिद्घ लकी अली यांच्या निधनाच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. त्यांना देखील एक व्हिडिओ शेयर करुन चाहत्यांना त्याविषयी (surender sharma rumour news) सांगावे लागले होते की, आपण जिवंत आहोत. त्यानंतर आता कवी सुरिंदर शर्मा यांच्या निधनाची बातमी सगळीकडे पसरली आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. बऱ्याचशा ठिकाणी सुरेंदर शर्मा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या होत्या. यासगळ्या प्रकरणावर सुरेंदर शर्मा यांनी खंत व्यक्त केली आहे.
शर्मा यांनी ज्यांनी कुणी अशा प्रकारच्या बातम्या व्हायरल केल्या आहेत त्यांच्यावर टीका केली आहे. मी सुरेंदर शर्मा हास्यकवी जिवंत असून या पृथ्वीतलावरुन बोलत आहे. असं म्हटलं आहे. मनोरंजन विश्वात मुशाफिरी करणाऱ्यांना हास्य कवी आणि व्यंगचित्रकार सुरेंदर शर्मा यांचे नाव माहिती असेल. त्यांनी आतापर्यत वेगवेगळ्या टीव्हीवरील कॉमेडी शो मध्ये सहभाग घेतला आहे. आता आपणच चाहत्यांपुढे जाऊन त्यांना जिवंत असल्याचे सांगितले पाहिजे असं शर्मा यांना वाटले आणि त्यांनी एक व्हिडिओ शेयर करुन त्याविषयी अधिक माहिती दिली आहे.
प्रिय मित्रांनो मी सुरेंदर शर्मा अजुन जिवंत आहे. माझ्या प्रकृतीची कुणाही चिंता करु नये. तुम्हाला वाटलं असेल की मी गेलो मात्र तसे नाही. मी तुमच्यासमोर आहे. असं शर्मा यांनी त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे. पंजाबी चित्रपट सत श्री अकालमधून त्यांनी आपल्या कारकीर्दीतून पदार्पण केलं होतं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.